संकटात धावून जाऊन मदत करणे ही महाराष्ट्राची संस्कृती : रोहित पवार

रोहित पवार म्हणाले, मी ज्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी आहे, त्या ठिकाणी ७०० ते ८०० मिमी पाऊस वर्षाला पडतो. पण, कोयना पाणलोट क्षेत्रात हाच पाऊस एका दिवसात पडला आहे. यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे.
Helping in times of crisis is the culture of Maharashtra: Rohit Pawar
Helping in times of crisis is the culture of Maharashtra: Rohit Pawar

कोयनानगर : ज्या ज्यावेळी महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्ती, गाव, शहरावर अडचण येते. त्यावेळी अख्खा महाराष्ट्र मदतीसाठी धावून जातो. ही आपली संस्कृती आहे, असे मत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. दरम्यान, अतिवृष्टीत नुकसान झालेल्या गावांतील लोकांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहेत, त्यामुळे ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्या सर्वांचे मी आभार मानतो, अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. 

आमदार रोहित पवार कोकणचा पहाणी दौरा करून आज कोयनानगर, पाटण येथील नुकसानीची पहाणी व मदत देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. ते म्हणाले, गेल्या आठवड्यात कोयना विभागावर नैसर्गिक आपत्तीमुळे ओढावलेले संकट भयावह आहे. या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी शासन तुमच्यासोबत आहे.

सत्तेवर आल्यापासून आपत्तीचा समूळ नायनाट करणारे हे शासन आहे. आपत्ती ही इष्टापती समजून शासन करत आहे. येत्या १५ ऑगस्ट पर्यंत स्थलांतरित केलेल्या तीन गावातील जनतेचे तात्पुरते स्थलांतर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहेत. त्याची कार्यवाही युध्दपातळीवर सुरु असुन १५ ऑगस्टपर्यंत बाधित पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

रोहित पवार म्हणाले, मी ज्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी आहे, त्या ठिकाणी ७०० ते ८०० मिमी पाऊस वर्षाला पडतो. पण, कोयना पाणलोट क्षेत्रात हाच पाऊस एका दिवसात पडला आहे. यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. अचानक आलेली ही परिस्थिती आहे. या परिस्थितीला धीराने तोंड दिले पाहिजे. बाधितांना विश्वासात घेऊन यापुढील वाटचाल होणार आहे. बाधित लोकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार आहे.

 यावेळी बोलताना युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, भुसल्ख्नाने कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी, बाजे ही गावे पूर्णतः उद्धवस्त झाली आहेत. त्या गावाचे तातडीने अन्य ठिकाणी पुनर्वसन होण्यासाठी उपाययोजना होणे ही प्राथमिकता आहे. बाधितांना विश्वासात घेवुन ही प्रक्रिया पारदर्शीपणे राबवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, सभापती राजाभाऊ शेलार, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, सत्यजित शेलार, बाळासाहेब कदम, रामभाऊ मोरे, रामभाऊ मोहिते, मनीष चौधरी, नरेंद्र शेलार आदी प्रमुख उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com