टेम्पररी अध्यक्ष आणि माजी अध्यक्षांत खडाजंगी!

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांच्यात नियमांवरून वाद
Haribhau Bagde-Bhaskar Jadhav

Haribhau Bagde-Bhaskar Jadhav

Sarkarnama 

मुंबई : विधीमंडळाच्या अधिवेशनात (Assembly Winter session) विधानसभेत भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे प्रभारी अध्यक्ष म्हणून बसल्यानंतर आक्रमकपणे ते बोलत असतात. अनेक वर्षे आमदार म्हणून काम पाहत असल्याने त्यांनाही नियम पाठ झाले आहेत. त्यांनी या नियमाचा पाठ माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांना शिकवला.

<div class="paragraphs"><p>Haribhau Bagde-Bhaskar Jadhav</p></div>
`मास्क लावला नसेल तर मलाही बाहेर काढा`;पाहा व्हिडिओ

विविध खात्यांवरील चर्चेला किती वेळ द्यायचा यावरून विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांत वाद झाला होता. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी या चर्चेला जो वेळ ठरवून दिला होता तो भास्कर जाधव हे तालिकेवर (अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्यानंतर) आल्यानंतर कमी करत असल्याचा बागडे यांनी मुद्दा मांडला. अध्यक्षांनी घेतलेला निर्णय तालिका अध्यक्षांना (टेम्पपरी अध्यक्ष) बदलता येत नाही. तो बदलणे म्हणजे अध्यक्षांचा अपमान आहे, बागडे यांनी सुनावले. तुम्ही अध्यक्षांचा अपमान करत आहात, असे एकदा बागडे म्हटल्यानंतर तुम्ही हे वाक्य पुन्हा म्हणा, असे सांगत जाधव यांनी बागडे यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Haribhau Bagde-Bhaskar Jadhav</p></div>
फडणवीस भुजबळांना म्हणाले; तुमच्यापेक्षा चारपट पुरावे माझ्याकडे आहेत

``मी तुमचा माजी अध्यक्ष म्हणून मान ठेवतो. आपला आदर राखून मी बोलतो. मी अध्यक्षांचा निर्णय बदलण्याचे बोललोच नाही. सभागृहाचा सेन्स घेऊन मी माझ्या भाष्याला सुरवात केली होती. तुम्ही अशा प्रकारचं विधान करू शकत नाही. अध्यक्षांच्या खुर्चीवर जो बसतो त्याला अध्यक्षांचे अधिकार लागू होतात, असे जाधव यांनी ठणकावून सांगितले. त्यावर कोणीतरी खाली बसून एक शब्द वापरला. त्यावर तुम्ही खाली बसून असे अध्यक्षांबद्दल बोलू तरी नका, असे जाधवांनी सुनावले. या विषयावर मी आता आणखी नानांविषयी (बागडे) बोलणार नाही,`` असे म्हणत हा विषय जाधवांनी थांबवला.

अधिवेशनाचा कालावधी कमी झाल्याने विरोधकांना जनतेचे प्रश्न मांडता येत नसल्याचे देेवेंद्र फडणवीस यांनी या वादावर सांगितले. त्यानंतर नंतरच्या विषयांवरील चर्चा सुरू झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com