सहा जिल्ह्यांत कोरोना वाढला; पालखी सोहळ्यावर निर्बंध येणार का? टोपेंनी दिली माहिती

राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे.
Covid 19 Latest Marathi News
Covid 19 Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. प्रामुख्याने मुंबई, पुण्यासह अन्य चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीतही याबाबत चर्चा करण्यात आली आहे. पण मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. (Covid 19 Latest Marathi News)

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या स्थितीबाबत सादरीकरण करण्यात आलं. त्यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हटी दर वाढल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे चाचण्या वाढवण्याचा सुचना देण्यात आल्या आहेत. काल रविवार असल्याने टेस्ट कमी झाल्या. आजपासून या वाढविण्याच्या कडक सुचना दिल्या आहेत. तीन ते आठ टक्के दर या सहा जिल्ह्यांमध्ये आहे. (Mumbai, Pune, Thane, Raigad and Palghar have high Positivity rate)

Covid 19 Latest Marathi News
काँग्रेसची एका आमदारासाठी धावपळ; राज्यसभेच्या उमेदवाराचे धाबे दणाणले

पण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण केवळ एक टक्के आहे. त्यामध्ये कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. त्यामुळे काळजीचे कारण नाही. पण प्रामुख्याने या जिल्ह्यांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक नसला तरी त्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मास्कसाठी दंड लावण्याचा अद्याप निर्णय नाही, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.

पालखी सोहळ्यासाठी निर्बंध नाहीत

बैठकीत पालखी सोहळ्याबाबतही चर्चा झाली आहे. करण जोहरच्या पार्टीत अनेक चित्रपट क्षेत्रातील लोकांना कोरोना झाला आहे. राजकीय क्षेत्रातील काही नेतेही पॉझिटिव्ह आले आहेत. पालखीमध्ये दहा ते पंधरा लाख लोकं जमणार आहेत. काळजी घेऊन वारीत सहभागी होण्याबाबत चर्चा झाली. वारीची तयारी आता पुढे गेली आहे. त्यामुळे कोणतीही बंधने किंवा अडचणी येणार नाहीत, असं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

Covid 19 Latest Marathi News
भाजपने निलंबित केलेल्या नुपूर शर्मा यांच्या अडचणी वाढणार; संजय पांडेंनीच सांगितलं कारण

धनंजय मुंडे यांना संसर्ग?

धनंजय मुंडे यांना ताप आहे. त्यांनी कोरोना चाचणी केली असून अजून रिपोर्ट आला नाही. त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे हेही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. लस घेण्याबाबतही नागरिकांना आवाहन करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. दोन डोस घेतलेल्या लोकांनी बुस्टर डोस घ्यावा, असं आवाहनही टोपे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com