विनय सिंहला उच्च न्यायालयाकडून दिलासा ; परमबीर सिहांच्या आशा पल्लवीत

न्यायालयाने याचिकेची दखल घेत विनय सिंह याला फरार घोषित करण्याचा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे परमबीर सिंह (Parambir singh) यांच्याही याबाबत सकारात्मक आशा वाढल्या आहेत.
 Param Bir Singh
Param Bir Singhsarkarnama

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांचा निकटवर्तीय विनय सिंह (vinay singh) याला फरार घोषित करण्याचा आदेश हायकोर्टाकडून (hc) रद्द केला आहे. विनय सिंह याला दंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले होते. या आदेशाला विनय सिंह याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.

न्यायालयाने याचिकेची दखल घेत विनय सिंह याला फरार घोषित करण्याचा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्याही याबाबत सकारात्मक आशा वाढल्या आहेत. खंडणीप्रकरणी परमबीर सिंह, रियाज भाटी आणि विनय सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सीआयडी या प्रकरणाचा तपास करीत आहे.

विनय सिंह याने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर विनय सिंह याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. दरम्यान सीआयडीने या तीनही आरोपींविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट जारी केले. पोलिसांनी अटकपूर्व जामीनावर आपल्याला सोडून द्यावे तसेच खटला पूर्ण होत नाही, तोपर्यंत पोलिसांना अटक न करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश द्यावेत, अशी मागणी करत अँड. अनिकेत निकम यांच्या मार्फत विनय सिंह याने याचिका दाखल केली.

 Param Bir Singh
साहित्य संमेलन १४४ वर्षांपासून घालमोड्या दादांचेच ; उद्धघाटनापूर्वी सूप वाजले!

या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती एस के शिंदे यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. विनय सिंहचे वकिल अनिकेत निकम यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार प्रक्रिया न पाळता फरार घोषित करण्यात आल्याचा युक्तीवाद केला. नियमानुसार फरार घोषित करण्यापूर्वी आरोपीला ३० दिवसांची नोटीस देणे अपेक्षित आहे. मात्र या ठिकणी नियम पाळले गेले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत दंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित करण्याचा आदेश रद्द केला.

परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी सत्र न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. ''आपल्याला फरार घोषित केल्याचा आदेश रद्द करा,'' अशी मागणी परमबीर सिंह यांनी या याचिकेत केली आहे. अधिवक्ता गुंजन मंगला यांच्या माध्यमातून त्यांनी सत्र न्यायाधीश एस.बी.भाजीपाले यांच्याकडे ही याचिका दाखल केली आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबई, ठाणे या ठिकाणी सहा गुन्हे दाखल आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com