राष्ट्रवादीला धक्का : मतदानाआधीच दोन मते कमी झाली... कैद्यांना अधिकार नाही..

विधान परिषद निवडणूक : अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना मतदानाची परवानगी नाकारली..
Anil Deshmukh |Nawab Malik
Anil Deshmukh |Nawab MalikSarkarnama

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी मतांची जमवाजमव करत असताना राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. हक्काची दोन मते गमविण्याची वेळ न्यायालयाच्या निकालामुळे राष्ट्रवादीवर आली आहे.

माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राज्यसभा निवडणुकीतही या दोघांना मतदान करता आले नव्हते. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला होता. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांना विधान भवनाता येता यावे, यासाठी कायदेशीर प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना आज हादरा बसला.

Anil Deshmukh |Nawab Malik
विधान परिषद : आघाडीच्या नेत्यांची धाकधुक वाढली ; बविआची मते भाजपच्या पारड्यात ?

याबाबत गुरूवारी झालेल्या सुनाणवीत कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असा युक्तिवाद अंमलबजावणी संचालनालयामार्फत करण्यात आला होता. तर त्यांना मतदानाचा अधिकार नाकारणे म्हणजे त्यांना निवडून दिलेल्या मतदारांना अवमान असल्याची भूमिका त्यांच्या वकिलांनी मांडली होती. या दोघांना न्यायालयाने दोषी ठरविलेले नाही. त्यामुळे त्यांचा मतदानाचा अधिकार कायम ठेवावा, हा युक्तिवाद न्यायालयाने नाकारला.मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार यांनी हा निकाल दिला. आता या निकालावर देशमुख आणि मलिक हे सर्वोच्च न्यायालयात अपील करणार का, हे पाहावे लागेल.

Anil Deshmukh |Nawab Malik
भाजपाला विधान परिषद राज्यसभेपेक्षा सोपी वाटतेय; ...पण २२ मते आणणार कुठून ?

राष्ट्रवादीचे विधानसभेत 53 आमदार आहेत. आता यातील दोघांना मतदान करण्यास परवानगी नसल्याने एकूण आमदार 51 उरले आहेत. विधानसभेतील 288 पैकी 285 आमदार मतदान करणार आहेत. त्यामुळे विधान परिषदेसाठीचा कोटा आता 26 वर आला आहे. प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी 26 मते हवी आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे असे दोघे जण रिंगणात आहेत. राष्ट्रवादीला आता आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी एका मताची गरज पडणार आहे. येत्या 20 जून रोजी विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com