Hasan Mushrif : हसन मुश्रीफांची तब्बल आठ तास चौकशी; ईडीच्या कार्यालयाबाहेर येताच म्हणाले...

Mumbai : ''मी काही चुकीचं केलेलं नाही. चौकशी अतिशय चांगली झाली..''
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama

NCP : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर ते आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. हसन मुश्रीफांची ईडीकडून आज तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली. तसेच सोमवारी पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

हसन मुश्रीफ यांनी ईडी कार्यालयात दाखल होताच ईडीच्या चौकशी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं. त्यामध्ये त्यांनी चौकशी सुरु असताना आपल्या विधानांची ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावी, अशी मागणी केली.

Hasan Mushrif
Jitendra Awhad : तुमची मुलगी ही आमचीही मुलगी; आव्हाडांना फडणवीसांकडून धीर; केली मोठी घोषणा!

यानंतर ईडीकडून हसन मुश्रीफ यांची तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली. तसेच त्यांनी मागणी केल्याप्रमाणे या चौकशीचं ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्डींग देखील करण्यात आलं. याबरोबरच सोमवारी पुन्हा एकदा त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे.

चौकशीनंतर ईडी कार्यालयातून बाहेर आल्यावर ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, ''ईडीच्या प्रश्नांची सर्व उत्तरं मी दिले आहेत. त्यांना सर्व सहकार्य केलं आहे. मला पुन्हा सोमवारी चौकशीसाठी बोलावलं आहे. मी काही चुकीचं केलं नाही. चौकशी अतिशय चांगली झाली'', असं ते म्हणाले.

Hasan Mushrif
Maharashtra Budget Session : विधीमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलणार; असा असेल नवा पुतळा

दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीने १२ मार्चला छापेमारी केली होती. गेल्या दीड महिन्यातील ही तिसरी छापेमारी होती.

त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना काहीसा दिलासा दिला. त्यानंतर ते आज चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com