Hasan Mushrif : मुश्रीफांना न्यायालयाचा दिलासा ; आता सोमय्यांच्या अडचणी वाढल्या..; सोमय्यांच्या चौकशीचे..

Hasan Mushrif vs Kirit Somaiya : सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कथित 40 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे.
Hasan mushrif Share Audio Clip
Hasan mushrif Share Audio Clip

Hasan Mushrif vs Kirit Somaiya : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संपत्तीची चौकशी आजही ईडीकडून सुरु आहे. अशातच त्यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. तर किरीट सोमय्यांच्या चौकशी आदेश न्यायालयाने दिले आहे.

फसवणुकीच्या आरोपाखाली कोल्हापूर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Hasan mushrif Share Audio Clip
ED सोमय्यांच्या सांगण्यावरुन चालते का.. ? ; अनिल परब भडकले...

आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अडकवण्यासाठी आणि अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) ससेमिरा पाठी लावण्यासाठी ‘हेतुपुरस्सर’ गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा मुश्रीफ यांनी तो रद्द करण्याची मागणी केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी 24 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना मुंबई उच्च न्यायालाने आदेश दिले आहेत.

मुश्रीफांवर नेहमीच आरोप करणारे भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांना यामुळे दणका बसला आहे. मुश्रीफांवर आरोप करणाऱ्या सोमय्यांची न्यायालयीन चौकशी करावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सोमय्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मुश्रीफ यांच्या कोणत्याही प्रकरणाचा थेट संबंध नसतानाही सोमय्यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत आणि एफआयआरची काँपी सर्वात आधी कशी मिळते, असा प्रश्न न्यायालयाने आज विचारला.या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

Hasan mushrif Share Audio Clip
ED Raid : लालूप्रसाद यादव यांच्यासह देशभरात १५ ठिकाणी ED ची छापेमारी ; लालुंच्या तीन मुलींच्या घरांवरही...

ईडीकडून आज (10 मार्च) साखर कारखान्याशी संबंधित कोल्हापूर आणि पुण्यात सर्च ऑपरेशन सुरु केल्याची वृत्त एएनआयने दिलं आहे. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कथित 40 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे.

कोल्हापूर जिल्हा बँकेतील काही खात्यांचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुरगूड पोलिस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in