Hasan Mushrif News : जामीनासाठी हसन मुश्रीफांची उच्च न्यायालयात धाव; उद्या तातडीने सुनावणी !

Hasan Mushriff News : अटकेपासून तूर्तास तरी संरक्षण..
Hasan Mushrif
Hasan Mushrif sarkarnama

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता. यानंतर आता मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी उद्या १३ एप्रिल रोजी तातडीने सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयात आता त्यांनी दिलासा मिळतो का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

मुंबई सत्र न्यायालयाच्याच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने कोणताही द्यायला नकार दिला. मात्र याचसोबत उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग खुला असल्याचे सांगितले होते. १४ एप्रिलपर्य़ंत त्यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. हसन मुश्रीफ आणि त्यांची तीन मुले यांची सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्जपुरवठा प्रकरणी ठपका ठेवून, चौकशी सुरू आहे. ईडीच्या वतीने मुश्रीफांविरोधात 35 कोटींचा मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला गेला आहे. आतापर्यंत त्यांच्यावर तीन वेळा ईडीने धाड टाकली आहे.

तिन्ही मुलांना अटकेपासून दिलेलं संरक्षण तूर्तास कायम :

हसन मुश्रीफ यांच्या तीनही मुलांनासुद्दा अटकपूर्व जामीना मिळावे, यासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. मुश्रीफ यांच्या तिन्ही मुले यांना अटकेपासून तूर्तास तरी संरक्षण आहे. साजिद , आबिद आणि नावेद या तिघांची अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी आज तहकूब झाली आहे. या प्रकरणी आता मुंबई सत्र न्यायालयात पुढची सुनावणी 20 एप्रिल रोजी होणार आहे. मात्र पुढील सुनावणी पार पडे पर्यंत कारवाई न करण्याचे तपास यंत्रणांना आदेश दिले आहेत.

मुश्रीफांचा दावा ईडीने फेटाळला :

हसन मुश्रीफ यांच्याकडून दावा फेटाळण्यात आले आहे. किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी यांच्या मोहिमेचाच एक हा भाग असल्याचा, त्यांनी पुनरूच्चार केला. राजकीय हेतूंनी आपल्यावर गुन्हा दाखल केला आहे, असे त्यांनी अटकपूर्व जामीन अर्जात म्हंटले आहे. ईडीकडून मात्र मुश्रीफांचे सर्व दावे फेटाळण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, राजकीय सुडबुद्धीचा मुश्रीफांचा आरोप ही योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. अर्जदारांकडून दोष इतरांवर ढकलण्याचा प्रयत्न होत आहे. असा युक्तिवाद ईडीकडून करण्यात आला.

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकूण झाल्यानंतर न्यायमूर्ती एम.जी. देशपांडे यांनी मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. आता याच आदेशाला मुश्रीफ उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. यासाठीच आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी विनंती मुश्रीफांच्या वकिलांकडून करण्यात आली होती. न्यायालयाने मुश्रीफांची ही विनंती मान्य करत, 14 एप्रिलपर्यंत त्यांना संरक्षण दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com