Hasan Mushrif ED Raid : ED कडून विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना टारगेट केलं जातंय का ?

Hasan Mushrif ED Raid : हसन मुश्रीफ यांच्या कागल व पुण्यातील घरावर ईडीने छापे टाकले आहेत.
ED Action
ED ActionSarkarnama

Hasan Mushrif ED Raid : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते.या प्रकरणी सध्या ईडी अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. मुश्रीफ यांच्या घरावर आज सकाळी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापे टाकले आहेत.

काही दिवसापूर्वी किरीट सोमय्यांनी याबाबत विधान केले होते. याआधी राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, मलिक यांच्यानंतर मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांच्यावर कारवाईचा इशारा सोमय्या यांनी दिला होता.

ED Action
G20 News : 'जी-20' म्हणजे काय ? ; काय आहे या G20 चा उद्देश ; जाणून घ्या सविस्तर !

आज कारवाई झाल्यानंतर मुश्रीफ म्हणाले, "आधी नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली. आता माझ्यावर कारवाई केली जात आहे. यानंतर काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यावर कारवाई होईल,असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. हे सर्व पाहता विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना टारगेट केलं जातंय का? अशी शंका येते, असे मुश्रीफ म्हणाले.

ED Action
NCP Hasan Mushrif ED Raid : मुश्रीफांचे खंदे समर्थकही ED च्या रडारवर

त्यांच्या कागल व पुण्यातील घरावर ईडीने छापे टाकले आहेत. मुश्रीफ यांच्या घरावरील छाप्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहे. अनेक कार्यकर्ते त्यांच्या घरासमोर जमले असून भाजपचा निषेध करीत आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणा दिल्या.

या कारवाईबाबत हसन मुश्रीफ म्हणाले, "यापूर्वीही तपास यंत्रणांनी माझी चौकशी केली आहे. मी त्यांना सर्व माहिती दिली आहे. आता पुन्हा कशासाठी छापे टाकले, हे समजत नाही. मला नाऊमेद करण्यासाठी हे सारे सुरु असून गलिच्छ राजकारण सुरु आहे. माझे सहकारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी माहिती देत आहेत,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com