Hasan Mushrif : 'माझ्यावर कारवाई व्हावी, यासाठी दिल्लीला चकरा मारणारा भाजपचा नेता कोण?'

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुण्यातील घरांसह त्यांच्या नातेवाईकांच्या निवासस्थानावर ईडीने छापेमारी केली.
Hasan Mushrif :
Hasan Mushrif :

Hasan Mushrif NEws : राष्ट्रवादी काँग्रसचे (NCP) नेते हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुण्यातील घरांसह त्यांच्या नातेवाईकांच्या निवासस्थानावर ईडीने छापेमारी केली. आज सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्या घरावर कारवाई करण्यात येत आहे. यावेळी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना घोटाळा आरोप प्रकरणी हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने (ED) छापेमारी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

या कारवाईनंतर मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया देताना भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचवेळी त्यांनी कार्यकर्त्यांना शांतही राहण्याचं आवाहन केलं आहे.

Hasan Mushrif :
Hasan Mushrif ED Raid : हसन मुश्रीफांनी सर्व आरोप फेटाळले, शिंदे फडणवीस सरकारला दिलं खुलं आव्हान

'आज सकाळपसून माझ्या आणि माझ्या नातेवाईकांच्या घरावर ईडीची छापेमारी सुरू आहे. माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापेमारी केली. मी काही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे मला बातमी फोनवरूनच मिळाली. माझ्या घराची, कारखान्यांची, नातेवाईकांच्या घरी तपास सुरु आहे. पण माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की सर्वांनी शांत राहावं आणि माझ्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कागल बंदची घोषणा केली आहे, ती त्यांनी मागे घ्यावी. सरकारी अधिकाऱ्यांना संपुर्ण सहकार्य करावं, माझ्यासाठी कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये," असं आवाहन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

दीड वर्षांपूर्वीही इडीने अशीच छापेमारी केली होती. तेव्हाच केंद्रीय यंत्रणांनी सर्व माहिती घेतली होती. पण आज पुन्हा कशासाठी छापा टाकला आहे, याबद्दल मला माहिती नाही, ३०-३५ वर्षांच सार्वजनिक जीवन सर्वांसमोर आहे. गेल्यावेळी झालेल्याही कारवाईत काहीच निष्पण्ण झालं नव्हतं. मग आता पुन्हा कोणत्या हेतून हा छापा टाकला, असाही सवाल त्यांनी मुश्रीफ यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, कागल तालुक्यातील भाजपचे एक नेते माझ्यावर कारवाई व्हावी यासाठी सातत्याने दिल्लीला चकरा मारत होते. गेल्या चार दिवसांपासून त्यांचे कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्यांना उघडपणे सांगत होते की आता मुश्रीफांवर ईडीचा कारवाई होणार आहे, असाही दावा मुश्रीफ यांनी केला आहे. तसेच हे सर्व गलीच्छ राजकारण केलं जात असेल तर त्याचा निशेषध आहे. असही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com