फडणवीसांच्या लोणकढी थापा!

आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना फडणवीस Devendra Fadnavis यांनी केंद्र सरकारच्या इंपिरिकल डाटामध्ये अनेक चुका असल्याचे सांगितले.
Devendra Fadnavis, Hari Narke

Devendra Fadnavis, Hari Narke

sarkarnama

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन (OBC Reservation) सध्या चांगलेच राजकारण रंगले आहे. आरक्षणाचा मुद्दा विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही गाजला. ओबीसी आरक्षणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यामध्ये शाब्दीक चकमकही झाली.

आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या इंपिरिकल डाटामध्ये अनेक चुका असल्याचे सांगितले. तसेच राज्यात ५ लाख व देशात ४० लाख जातींची नोंद झाली आहे. त्यावर ज्येष्ठ अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. हरी नरके ओबीसी आरक्षणावर नियमीत भूमिका मांडत असतात.

<div class="paragraphs"><p>Devendra Fadnavis, Hari Narke</p></div>
टेम्पररी अध्यक्ष आणि माजी अध्यक्षांत खडाजंगी!

फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर नरके यांनी आक्षेप घेतला आहे. त्यासंदर्भात त्यांनी फेसबूक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये ते म्हणाले, ''फडणवीसांच्या लोणकढी थापा, गुरुवारी विधानसभेत ओबीसी आरक्षण व केंद्राकडील SECC 2011 चा इंपिरिकल डाटा यावर बोलताना फडणवीस म्हणाले की केंद्राच्या त्या सर्व्हेत महाराष्ट्रात ४ लाख व देशात ४० लाख जातींची नोंद झाली. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ट्रीपल टेस्ट प्रथम १३/१२/२०१९ ला सांगितली. फडनवीसांना रेटून आणि अहोरात्र खोटे बोलायची सवय झाल्याने ते ओबीसी आणि विधानसभेचा हक्कभंग करीत आहेत,'' असा आरोप नरके यांनी केला.

''इंपिरिकल डाटा आणि ट्रीपल टेस्ट सर्वोच्च न्यायालयाने के. कृष्णमूर्ती केसच्या निकालात २०१० मध्येच करायला सांगितली होती. २०१९ ला न्या.खानविलकर यांनी ट्रीपल टेस्टचा पुनरुच्चार केला. जातीच्या कॉलममध्ये ४ आणि ४० लाख अशा राउंड फिगरमध्येच चुका कशा काय झाल्या? २०१८ साली मोदी सरकारने हा डाटा कोणालाही द्यायचा वा दाखवायचा नाही, असे ठरवले असताना १/८/२०१९ नंतर तो फडणवीसांनी कसा नी कुठे बघितला,'' असा सवाल नरके यांनी उपस्थित केला आहे.

<div class="paragraphs"><p>Devendra Fadnavis, Hari Narke</p></div>
ओबीसी आरक्षणासाठी आंबेडकरांचा एल्गार ; 'वंचित'चे कार्यकर्ते ताब्यात

''नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारीया यांनी देशात ५ लाख गोत्रे, पोटजाती, जाती यांची नोंद झाल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्या ५ ची संख्या फुगवून फडणवीसांनी ४० लाख केली. गंमत बघा या सर्व्हेत ३५ प्रकारची माहिती जमा करण्यात आली. ११७ कोटी भारतीयांच्या या माहितीत फक्त जातीच्या रकान्यात चुका झाल्या. बाकी ३४ रकाने मात्र अचूक आहेत हे कसे काय? मोदी सरकार लोकसभेत आणि सर्वोच्च न्यायालयात सांगते फक्त १. १३% चुका आहेत. मग फडणवीस म्हणतात ४० लाख जाती नोंदल्या गेल्या. हा तर जागतिक विक्रम झाला. भारतात आज रोजी ४ हजार ६३५ जाती असल्याचे भारत सरकारचा 'पीपल ऑफ इंडिया' चा सर्व्हे सांगतो, फडणवीस त्या ४ हजारच्या थेट ४० लाख जाती करतात,'' असा हल्ला बोल नरके यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com