BJP : एका शब्दामुळे राऊतांनंतर आता चित्रा वाघ होताहेत ट्रोल

Chitra Wagh News : तो शब्द संसदीय झाला आहे की त्याचा अर्थ बदलून ‘नॉटी’ झाला आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
Chitra Wagh
Chitra WaghSarkarnama

Chitra Wagh News : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांनी रस्त्याने जाणाऱ्या एका वकील युवतीला शिवीगाळ करत भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणावर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलेल्या टि्वटची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.

या निमित्ताने चित्रा वाघ यांनी यापूर्वी केलेल्या काही टि्वटचीही चर्चा होत आहे. त्यांच्या टि्वटची तुलना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी तीन वर्षांपूर्वी केलेल्या एका टि्वटशी केली जात आहे. राऊतांच्या त्या टि्वटमुळे गदारोळ झाला होता.

दयानंद इरकल यांचा निषेध करताना याबाबत चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करुन माहिती दिली आहे. "तळपायाची आग मस्तकात नेणाऱ्या या प्रकारात या हरामखोर आरोपीला बेड्या ठोकायला पुणे शहर पोलिसांना कुणाची वाट पाहावी लागते. त्याला तात्काळ अटक करा," असे त्यांनी टि्वट केले आहे. चित्रा वाघ या हरामखोर या शब्दाचा नेहमी वापर करीत असल्याचे समोर आले आहे. काल (मंगळवारी) त्यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.

Chitra Wagh
Kasba By Election : मनसेला राष्ट्रवादीनं करुन दिली 'या' निवडणुकीची आठवण

सोमवारी नाशिकमधील सिन्नर येथे एका महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याची घटना त्यांनी ट्विटरवरून सांगितली आहे. यातही त्यांनी आरोपींचा उल्लेख ‘हरामखोर’ असाच केला आहे. तर, हिंगोलीमध्ये काँग्रेसचे दिवंगत आमदार राजीव सातव यांच्या पत्नी आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर 8 फेब्रुवारी 2023 रोजी हल्ला करण्यात आला होता.

याबद्दलचा निषेध करण्याचे ट्वीट चित्रा वाघ यांनी 9 फेब्रुवारी 2023 रोजी केले होते. त्यात हल्लेखोराचा त्यांनी ‘हरामखोर’ असा उल्लेख केला होता. त्यामुळे हा शब्द संसदीय झाला आहे की त्याचा अर्थ बदलून ‘नॉटी’ झाला आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. यावरुन चित्रा वाघ यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

महिला अत्याचाराबद्दलचा संताप व्यक्त करणे गैर नाही, हे प्रकार थांबवले पाहिजे, असे अनेकांचे मत आहे. पण तरीही परिस्थितीच भान लक्षात घेऊन योग्य शब्द वापरले पाहिजे, अशा सूचना नेटकऱ्यांनी चित्राताईंना केल्या आहेत.

संजय राऊत यांनी साधारणपणे तीन वर्षांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौत हिच्याबद्दल बोलताना ‘हरामखोर’ शब्दाचा वापर केला होता. यावरून मोठा गदारोळ झाला होता. राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com