`इन्शाल्ला, नवाब मलिक पुढच्या वर्षी तुरुंगात दिसतील...`

हाजी अराफत शेख (Haji Arafat Sheikh) यांचे मलिक यांच्यावर पलटवार
Hazi arafat sheikh
Hazi arafat sheikh Sarkarnama

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर भाजपचे नेते हाजी अराफत शेख (Hazi Arafat Sheikh) यांनी आरोपांचा धुरळा उडवला आहे. पुढीव वर्षभरात मलिक हे तुरुंगात असतील, असा दावाही शेख यांनी केला आहे. इन्शाल्ला, माझ्या या मोहिमेत अल्ला मला सहकार्य करेल, असेही शेख म्हणाले.

महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाचा गेली दोन वर्षे भ्रष्टाचारी कारभार सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या आहेत. या तक्रारी मी ईडीकडे देणार असल्याचे शेख यांनी सांगितले.

मुंब्र्यातील जमीन ही मलिक यांनी मनमानी करत लिजवर दिली आहे. कुर्ला भागात चरस मलिक म्हणून कोणाला म्हटले जाते याचा खुलासा मी करणार आहे. एका मोठ्या पत्रकाराची हत्या आणि अंडरवर्ल्ड यांच्यातला संबंध मी बाहेर काढणार आहे. नवीन वर्ष मलिक हे अनिल देशमुख यांच्या शेजारी तुरुंगात साजरे करतली, असेही शेख यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक हे किती हुशार मंत्री आहेत, हे वक्फ बोर्डातील घोटाळ्यातून दिसते आहे. पुण्यातील वक्फ बोर्डाच्या जागेचे पैसे खासगी अकौंटवर आल्यानंतर त्यातील सुमारे दोन कोटी रक्कम मलिक यांच्या निकटवर्तीयाच्या खात्यावर आली होती. मात्र त्यांचे बिंग फुटल्याने ही रक्कम पुन्हा परत देण्यात आली. त्यानंत स्वतः मलिक यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना फोन करून ज्यांच्या अकौंटवर हे पैसे आले त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला लावला. मात्र ज्यांच्या सहीने हे पैसे ट्रान्सफर झाले त्या वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर काहीच कारवाई झाली नाही, असे शेख यांनी म्हटले आहे.

Hazi arafat sheikh
पुणे वक्फ बोर्डातील घोटाळा लपवण्यासाठी मलिकांकडून आरोपांची सर्कस

वक्फ बोर्डाच्या मार्फत मुसलमानांची जमीन विकण्याचा सपाटा मलिक यांनी लावला आहे. अनेक जमिनी विकण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अल्पसंख्यांक विभागातील सीईओ आणि डेप्युटी सीईओ यांची मनमानी सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

माझा भाऊ नकली नोटा प्रकरणात पकडला गेला, हा मलिक यांचा आरोप शेख यांनी मान्य केला. त्याने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. तशी शिक्षा त्याने भोगली आहे. आता त्याच्याशी माझा कोणताह संपर्क नाही. मात्र मलिक हेच त्याच्या जास्त जवळ आहेत, असा दावा शेख यांनी केला. माझ्या भावाच्या सर्व समारंभात मलिकांची हजेरी असल्याचे त्यांनी सांगितले.

Hazi arafat sheikh
देवस्थान जमिन घोटाळा : वक्फ बोर्डाने फटाके फोडले; महसूलचा बॉम्ब कधी फुटणार?

मलिक यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते म्हणून नाही तर शाहरूख खानचे प्रवक्ते म्हणून काम पाहिले. मुसलमानांच्या मशिदी, दर्गा यांच्या जमिनी विकल्याने त्यांचे शाप मलिक यांना लागतील. पत्रकारांच्या हत्येशी काय संबंध आहे, त्याचा शाहरूखशी काय संबंध आहे, हे सारे मी आता जाहीर करणार आहे. मलिक यांनी आता पळ काढू नये. माझ्या आरोपांना त्यांनी उत्तरे द्यावीत, असे आव्हानही शेख यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com