Haji Arafat Shaikh : भाजप नेते हाजी अराफत शेख यांना पुन्हा धमकी,गुन्हा दाखल

Bjp News: शेख यांच्या घरात घुसून त्यांना धमकावण्याचा आरोपीकडून प्रयत्न...
Haji Arafat Shaikh
Haji Arafat Shaikh Sarkarnama

Crime News Haji Arafat Shaikh : भाजप नेते व अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांना धमकी देण्यात आली आहे. शेख यांच्या घरात घुसून त्यांना धमकावण्याचा आरोपीनं प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. एका प्रकरणा संदर्भात आरोपी हा हाजी अराफत शेख यांच्याकडे आला होता. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून देण्यासंदर्भात त्यानं तगादा लावला होता. १० जानेवारी रोजी ही घटना घडली आहे.

Haji Arafat Shaikh
Sanjay Raut: '' हे प्रचाराचं भूमिपूजन..!''; पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरुन संजय राऊतांचा भाजपला टोला

या प्रकरणी हाजी अराफत शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सलीम यमनी चाऊस असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत असून प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Haji Arafat Shaikh
Accident News : गुरुवार ठरला अपघाताचा दिवस ; तेरा जणांचा मृत्यू ; दैव बलवत्तर म्हणून ५ महिन्यांचे बाळ बचावले..

...यापूर्वीही शेख यांना भाजप सोडण्यासाठी धमकी!

भाजप नेते व अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष यांना या अगोदरही चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली होती. शेख यांची इनोव्हा क्रिस्टा ही गाडी कुर्ला न्यायालयाजवळील एलबीएस रोड येथील त्यांच्या घराजवळ उभी असताना त्यांच्या गाडीची काच दोन अनोळखी व्यक्तींनी तोडली. यावेळी गाडीमध्ये प्लास्टिक पिशवीत एका पेव्हर ब्लाँक आणि शेख यांच्या नावाने लिहिली धमकीची चिठ्ठी सापडली.

या चिठ्ठीत "तुझे आखरी चेतावणी दे रहा हू, बीजेपी छोड दे, लोगों को गुमराह करना बंद कर, समजायाता तेरे को लेकीन समज नही आ रहा है! अगली बार पथर नही कुछ और होगा. सुधरजा नही तो जान से हाथ धो बैठेगा. परिवारलोकी सोच अगली बार मौका नही दुगां, कांदे लिंबू की बरसात करूंगा ये आखरी चान्स है! बीजेपी छोड...." असा इशाराही देण्यात आला होता. या प्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com