थेट सीबीआय संचालकांना समन्स बजावणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सायबर सेलवरच 'हल्ला'

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलचा ई-मेल आयडी हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Cyber Attack
Cyber Attack

मुंबई : मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) सायबर सेलवरच (Cyber Cell) सायबर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पाकिस्तानी हॅकरने सायबर सेलचा ई-मेल आयडी हॅक केल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे याच सायबर सेलने तीन दिवसांपूर्वी थेट सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते.

मुंबई पोलिसांच्या पूर्व सायबर विभागाचा ई-मेल आयडी हॅक झाला आहे. विभागाच्या अधिकृत ई-मेल आयडीवरून राज्यभरात जातायत ई-मेल जात आहेत. जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यामागील दहशतवाद्याचा मुंबईत खात्मा, अशा आशयाचा ई-मेल हा काही ठिकाणी गेल्याचे उघडकीस आले आहे. राज्य सायबर सेलने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.

हॅकरने पाठवलेल्या ई-मेलसोबत एक इंटेलिजन्स रीपोर्ट नावाने पीडीएफ फाईलही जोडली आहे. ही फाईल ओपन केल्यास डेटा चोरी होण्याचा धोका आहे. राज्य सायबर सेलने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना असा ई-मेल आल्यास उघडू जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. सायबर विभागाचाच ई-मेल आयडी हॅक झाल्याने खळबळ उडाली आहे.

Cyber Attack
एअर इंडियाची टाटाला विक्री ही तर 'पाँझी स्कीम'! भाजप खासदाराचा घरचा आहेर

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) प्रमुख रश्मी शुक्ला यांनी बदली रॅकेट संबंधित एक रेकॉर्डिंग केले होते. त्याचा एक अहवालही त्यांनी तयार केला होता. हा अहवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात वाचून प्रसारमाध्यमांसमोर ठेवला होता. यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सायबर सेलने अज्ञात व्यक्तींविरोधात गोपनीयता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण घडले त्यावेळी जयस्वाल हे राज्याचे पोलीस महासंचालक होते. नंतर त्यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. आता याच प्रकरणात जयस्वाल यांना समन्स बजावून 14 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

Cyber Attack
भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने मोदींना पुन्हा एकदा जाहीरपणे आणलं अडचणीत

दरम्यान, अनिल देशमुखांवरील 100 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी सीबीआयने मागील आठवड्यात मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावले होते. कुंटे यांना ८ ऑक्टोबरला सीबीआयच्या मुंबई कार्यालयात तर पांडे यांनी ९ ऑक्टोबरला सीबीआयच्या दिल्ली कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. या दोन्ही अधिकाऱ्यांनी सीबीआय चौकशीला सामोरे जाण्यास नकार दिला होता सीबीआयने आमच्या कार्यालयात येऊन चौकशी करावी, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यानंतर आठवडाभरातच थेट सीबीआय संचालकाना समन्स बजावण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com