हो मी ३०० ते ५०० रुपये घेतले; पण एवढी कमी फी कोणता वकील घेतो का? सदावर्तेंचा सवाल

Gunratna Sadavrte | : सदावर्तेंनी न्यायालयात दिली पैसे घेतल्याची कबुली...
gunratna sadavrate
gunratna sadavrateSarkarnama

मुंबई : सिल्वर ओकवरील हल्ल्याला चिथावणी देणे, एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करणे अशा आरोपांखाली सध्या मुंबई पोलिसांकडून अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna sadavrte) यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. त्यांना या प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असली तरी पोलिसांकडून तपास सुरु आहे. तपासादरम्यान मुंबई पोलिसांना (Mumbai Police) अनेक धक्कादायक गोष्टी मिळाला असल्याचा दावा करण्यात येत आहे.

गावदेवी पोलिसांना तपासादरम्यान, सदावर्तें यांच्या घरातून पैसे मोजायचे मशीन सापडले आहे. शिवाय पोलिसांनी दोन रजिस्टर ताब्यात घेतले आहेत. काही मालमत्ता आणि केरळमधून घेतलेल्या गाडीबाबतही पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. याच सगळ्याच्या चौकशीसाठी सदावर्ते यांचा ताबा मिळावा यासाठी पोलिसांनी न्यायालयात पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र ही मागणी फेटाळून लावत त्यांची न्यायालयीन कोठडी कायम ठेवण्यात आली आहे.

gunratna sadavrate
सदावर्तेंना आणखी एक धक्का; राहत्या घराला टाळं लागणार?

पण आजच्या सुनावणीदरम्यान सदावर्ते यांनी आपले आधीचे पैसे घेतले नसल्याच्या जबाबात बदल करत आपण पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. मात्र हे पैसे केवळ फी म्हणून घेतल्याचे त्यांनी आज न्यायालयात सांगितले. बचाव करताना सदावर्ते म्हणाले, मी चौकशीत सहकार्य करत आहे. जयश्री पाटील यांना अटकपूर्व जामीन कोर्टाने मंजूर केला आहे. त्यामुळे माझे मूलभूत हक्क कोर्टाने अबाधित ठेवावे. पोलिसांनी जी कागदपत्र जप्त केले ते वकालतनामा आहेत.

gunratna sadavrate
पोलिसांकडून सदावर्तेंचा करेक्ट कार्यक्रम; मुंबई, साताऱ्यानंतर आता कोल्हापुरचा नंबर!

सोबतच जे नोट मोजायचे मशीन आहे ते ३ हजारांची आहे. कामकाजाच्या सुविधेसाठी ती घेण्यात आली आहे. मी मालमत्ता घेतल्या त्या सर्व बँकांच्या रेकॉर्ड्सवर आहेत. गाडी देखील सेकंड हॅण्ड घेतली. ती माझ्या स्वातंत्र्यसैनिक असलेल्या सासूला यात्रेसाठी घेतली आहे. मी ३०० ते ५०० रुपये घेतले. पण ते फक्त न्यायालयीन कामकाजासाठी घेतले, एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो, हे सांगावं असा सवाल करत सदावर्ते यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com