गुणरत्न सदावर्ते यांनी कैद्यांना दिले योगाचे धडे!

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सदावर्तेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
Gunratrna Sadavarte
Gunratrna Sadavartesarkarnama

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. या प्रकरणी संपकऱ्याचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte)यांच्याविरोधात राज्यात विविध ठिकाणी गु्न्हे दाखल करण्यात आले आहे. सदावर्ते यांची काल जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर सदावर्ते हे माध्यमांशी बोलत होते. (Gunratan Sadavarte Latest Marathi News)

गुणरत्न सदावर्ते (कैदी नंबर ५६८१) हे अठरा दिवसानंतर काल (मंगळवारी) कारागृहाच्या बाहेर आले. त्यानंतर सदावर्ते म्हणाले, "मी काही कैद्यांना विपशना शिकवली, योग शिक्षक असल्याने काही कैद्यांना योगाचे धडे दिले. माझा कैदी क्रमांक ५६८१ हा लोक लक्षात ठेवतील, कारागृहातील माझा तो काळ येणाऱ्या पिढीचं लक्ष वेधून घेईल," असे गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Gunratrna Sadavarte
इंधनदरवाढ : मोदी-ठाकरे आमनेसामने ; आर्थिक बाबतीत केंद्राकडून सापत्नभावाची वागणूक

शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर सदावर्ते यांच्या विरोधात अनेक ठिकाणी तक्रार नोंदवण्यात आले. ज्यामुळे विविध ठिकाणच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पण अखेर काल त्यांना दिलासा मिळाला असून त्यांची तुरुंगातून सूटका झाली आहे.

ता. ८ एप्रिलला सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता.26) सदावर्ते यांना जामीन मंजूर केल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. यानंतर सदावर्तेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

"राज्यात आता आणीबाणीची स्थिती आहे. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. याचबरोबर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत. राज्य सरकारनं आपल्या वागण्याचा थोडा तरी विचार करावा आणि कष्टकरी समाजाला सरकारने समजून घ्यावं,"असे सदावर्ते म्हणाले.

काल (मंगळवारी) जेल बाहेर सदावर्ते यांच्या स्वागतासाठी हार आणि पेढे आणले गेले आहेत. 'हम है हिदुस्थानी. हा विजय हिंदुस्थानींचा आहे. पत्नी, मुलगी आणि मित्र परिवाराने साथ दिली. हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आहे. भारताच्या संविधानापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही.'असं ही त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे करता येईल ते करु. भ्रष्टाचाराविरोधात लढू असं देखील सदावर्ते यांनी म्हटलं आहे. काल गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला होता. पुण्यात दाखल एफआयआरबाबत सदावर्तेंना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.

Gunratrna Sadavarte
डुक्कर कितीही चांगले असले तरी ते गटारातच जाते ; मिटकरी-खोतांमध्ये रंगला 'कलगी-तुरा'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com