गुंडगिरीने शिवसेना सरकार वाचवू शकणार नाही... रामदास आठवले

मंत्री आठवले Ramdas Athawale म्हणाले, आता बहुमत भाजप BJP; एकनाथ शिंदे Eknath shinde आणि महायुतीकडे Mahayuti आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस devendra Fadanvis यांनी सरकार स्थापनेचा दावा करावा.
Ramdas Athawale News, Shivsena News, Maharashtra Political Crisis
Ramdas Athawale News, Shivsena News, Maharashtra Political Crisissarkarnama

मुंबई : महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असून त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या स्थितीत राजीनामा द्यायला पाहिजे होता. अल्पमतात आलेले महाविकास आघाडी सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा करीत असलेला दावा हास्यास्पद आहे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.(Maharashtra Political Crisis)

शिवसेनेचे 40 हुन अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. काही अपक्ष आमदार शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असे सांगून मंत्री आठवले म्हणाले, आता बहुमत भाजप; एकनाथ शिंदे आणि महायुतीकडे आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सरकार स्थापनेचा दावा लवकर करावा.(Ramdas Athawale News)

Ramdas Athawale News, Shivsena News, Maharashtra Political Crisis
Eknath Shinde: एकनाथ शिंदे उद्या मुंबईत येऊन घेणार मोठा निर्णय!

शिवसेनेचे जे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत त्यांच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत. पोलिसांच्या समोर हल्ले होत असताना पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत. महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेचा वारसा आहे. त्यावर हल्ला होत आहे. राज्याची प्रतिमा डागाळली जात आहे.

Ramdas Athawale News, Shivsena News, Maharashtra Political Crisis
‘आले शंभर, गेले शंभर, उद्धव ठाकरे एक नंबर’

यावर राज्याच्या पोलिस महासंचालकांनी कठोर भूमिका घेऊन पोलिसांना कायदा सुव्यवस्थेबाबत कर्तव्य पार पाडण्याचे निर्देश द्यावेत, असेही श्री. आठवले म्हणाले. शिवसेनेने पराभव स्वीकारला पाहिजे. त्यासाठी आमदारांच्या कार्यालयावर हल्ले करणे; गुंडगिरी करणे योग्य नाही. शिवसेनेने गुंडगिरी थांबवावी. अन्यथा गुंडगिरीला गुंडगिरीने उत्तर द्यावे लागेल. गुंडगिरीने शिवसेना सरकार वाचवू शकणार नाही, असा इशाराही मंत्री आठवले यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com