सदावर्तेंचे १५ दिवसांपासून तुरुंगात उपोषण; फक्त ज्यूस पित असल्याची माहिती

Gunratna Sadavrte | : सदावर्ते सध्या आर्थर रोड कारागृहात
Gunratna Sadavarte news update
Gunratna Sadavarte news updatesarkarnama

मुंबई : सिल्वर ओकवरील हल्ल्याला चिथावणी देणे, एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करणे, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान भडखाऊ वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणे अशा आरोपांखाली अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavrte) यांच्यामागे महाराष्ट्रभरातील पोलिसांचा ससेमिरा लागला आहे. ते सध्या आर्थर रोड कारागृहात असून यापूर्वी त्यांचा ताबा गावदेवी, सातारा, कोल्हापूर पोलिसांनी घेतला आहे.

अशातच मागील १५ दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते यांचे तुरुंगातच उपोषण सुरु असल्याची माहिती मिळत आहे. सरकारी वकील अरूणा पै यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मागच्या १५ दिवसांपासून सदावर्ते जेवत नसून ते त्यांनी जेवण करण्याचे ठरवले आहे. ते ज्या-ज्या पोलिस ठाण्याच्या कोठडीत होते, तिकडचे पोलिस वेळोवेळी त्यांना अन्न ग्रहण करण्याची विनंती करत होते. मात्र ते सकाळ-संध्याकाळ केवळ ज्युस पीत असल्याची माहिती दिली.

Gunratna Sadavarte news update
सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास 'शुट अ‍ॅट साईट'? वळसे पाटलांनी स्पष्टचं सांगितले...

दरम्यान सदावर्ते यांना आतापर्यंत गावदेवी पोलिस, सातारा पोलिस, कोल्हापूर पोलिस यांनी ताबा घेतला आहे. या सर्व ठिकाणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. तर अकोला आणि पुणे याठिकाणी त्यांना अटकपूर्व जामिन मिळाला आहे. याशिवाय सदावर्ते यांच्या विरोधात बीड, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com