Gujrat Election 2022 : मोदींच्या झंझावाती प्रचाराला आव्हान देण्यासाठी काँग्रेसकडून 'राहुल अस्र' ! ; मास्टरप्लॅन तयार

Gujrat Election 2022 : भाजपच्या प्रचाराला प्रतिआव्हान देण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु आहे.
Gujrat Election 2022 latest news
Gujrat Election 2022 latest newssarkarnama

Gujrat Election 2022 : गुजरात विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपकडून गुजरात विधानसभेच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह स्टार प्रचारकांची मोठी फौज मैदानात उतरवली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने देखील प्रचारासाठी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावाती प्रचाराला आव्हान देण्यासाठी काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी 'अस्र' बाहेर काढले आहे. त्यांचा नवीन मास्टर प्लॅन सुद्धा तयार केला जात आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १ व ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमधील आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरणात चांगलं तापलं आहे. आता भाजपच्या प्रचाराला प्रतिआव्हान देण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु आहे.

भारत जोडो यात्रेच्या भरगच्च कार्यक्रमातून वेळ काढत राहुल गांधींनी काँग्रेसच्या प्रचारासाठी गुजरात गाठल्याचं दिसत आहे. आता त्यांच्या २१ नोव्हेंबरला गुजरातमध्ये दोन सभा होणार आहेत. यापैकी पहिली सभा सुरतमध्ये, तर दुसरी राजकोटमध्ये होणार आहे. एकप्रकारे मोदींच्या झंझावाती प्रचाराला काँग्रेसकडून राहुल गांधींच्या रूपाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘भारत जोडो’ यात्रेनंतरची ही पहिलीच राजकीय सभा असणार आहे.

Gujrat Election 2022 latest news
Thackeray Vs Shinde : श्रेयवादावरुन ठाकरे-शिंदे गटामध्ये जुंपली !

देशातील वाढती महागाई, बेरोजगारी यांच्यासह विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारवरील वाढता रोष आणि राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेला मिळणारा उदंड प्रतिसाद याचाच फायदा गुजरात निवडणुकीत उचलण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.

२०१७ साली विधानसभेच्या निवडणुकीत एसटी संवर्गासाठी राखीव असलेल्या २७ जागांपैकी १७ जागांवर काँग्रेसने भाजपला धोबीपछाड दिला होता. यात महत्वाची बाब म्हणजे या १७ जागांपैकी १४ जागा दक्षिण गुजरातमधील होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधींच्या सभांनी राजकीय समीकरणे बदलतील आणि काँग्रेसला निवडणुकीत दणदणीत यश मिळेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. यंदा भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आपने गुजरात निवडणुकीत उडी घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com