गुजराती समाज गेल्याने महाराष्ट्राला फरक पडणार नाही - प्रकाश आंबेडकर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी आपली मते व्यक्त केली.
Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar News Sarkarnama

मुंबई - राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती व मुंबई संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते तथा माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी आपली मते पत्रकार परिषदेतून व्यक्त केली. ( Gujarati society will not make a difference to Maharashtra )

राज्यात केवळ दोनच जणांचे मंत्रिमंडळ आहे. याबाबत अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यात दोनच जणांचे मंत्रिमंडळ असल्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत पण देवेंद्र फडणवीस फक्त मंत्री ठरतात. घटनेप्रमाणे जोपर्यंत 12 मंत्री शपथ घेत नाहीत. तोपर्यंत कॅबिनेट होत नाही. त्यामुळे या दोघांनी घेतलेले निर्णय वादग्रस्त ठरतील. या दोघांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात कोणी न्यायालयात गेले तर न्यायालय या मंत्रिमंडळाच्या निर्णयांना स्थगिती देउ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

Prakash Ambedkar News
video : फडणवीसांना शंकरराव चव्हाण केलं ; प्रकाश आंबेडकर

ते पुढे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त जागा लढविणार आहेत. आम्ही निवडणुकांत काँग्रेस बरोबर युती करण्यास तयार आहोत. आम्ही काँग्रेसला ऑफर दिलीय. त्यांचा अद्याप निर्णय दिलेला नाही, असे त्यांनी सांगितले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई संदर्भात केलेल्या वक्तव्यावर आंबेडकरांनी सांगितले की, मुंबईतील मील्स या राजस्थानी लोकांकडे होत्या. संपानंतर राजस्थानी लोक निघून गेले पण मुंबईवर परिणाम झाला नाही. मुंबईतील गुजराती समाज हा दाणाबाजार आणि दलालीमध्ये आहे. हा समाज गेल्यावरही मुंबईवर परिणाम होणार नाही. कारण आज मुंबई मॅन्युफॅक्चरिंग हब नाही तर ट्रेडिंग हब आहे. हे ट्रेडिंग हब कुठला एक समाज चालवत नाही, तर एम बी ए केलेला तरुण चालवतो. हा गुजराती समाज गेल्याने महाराष्ट्राला फरक पडणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

Prakash Ambedkar News
प्रकाश आंबेडकर काँग्रेसकडून राज्यसभेवर? वंचित बहुजन आघाडीने स्पष्टचं सांगितले!

शिवसेना अधिकृत कोणाची याबाबत न्यायालयात सुरू असलेल्या वादावर त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत टाळाटाळ केलीय. शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या कारवाईवरील स्थगिती उठवण्याबाबत सर्वोच्च न्यायालय आता टाळाटाळ करणार नाही ही अपेक्षा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर हे सरकार राहील की जाईल अशी परिस्थिती निर्माण होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in