Gujarat Elections 2022 : अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेसनं सोपवली मोठी जबाबदारी

Ashok Chavan : गुजरात विधानासभेच्या पहिल्या टप्यासाठी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली आहेत.
Gujarat Elections 2022
Gujarat Elections 2022 sarkarnama

Gujarat Elections 2022 : नवी दिल्ली : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच पक्षानी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. उमेदवाराची यादी, स्टार प्रचाराची यादी सध्या पक्षाकडून जाहीर होत आहे. भाजपने दोन दिवसापूर्वी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता कॉंग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली आहेत. (Gujarat Elections 2022 latest news)

गुजरात विधानासभेच्या पहिल्या टप्यासाठी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली आहेत. यात पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, अशोक गहलोत, भूपेश बघेल, भूपेंद्र सिंह हुड्डा, दिग्विजय सिंह, कमलनाथ, सचिन पायलट, तारीक अनवर, बीके हरिप्रसाद, अशोक चव्हाण, शक्ति सिंह गोहिल, रघु शर्मा, मोहन प्रकाश यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातून चव्हाण यांच्या व्यतिरिक्त माजी मंत्री शिवाजीराव मोघे, नसीम खान व रामकिशन ओझा यांचा या यादीत समावेश आहे.

Gujarat Elections 2022
Shivsena : अशा भुलथापांना यावेळी भुलणार नाही ; महागाईवरुन मोदी सरकारला शिवसेनेनं सुनावलं

पवन खेड़ा, भरत सिंह सोलंकी, उषा नायडू, कन्हैया कुमार, कांतिलाल भूरिया, इमरान प्रतापगढ़ी, अमरिंदर सिंह राजा बरार, अर्जुन मोधवाडिया, सिद्धार्थ पटेल यांच्या नावाचाही यात समावेश आहे.

असा आहे गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम

पहिल्या टप्प्यासाठी 5 नोव्हेंबरला अधिसूचना जारी होणार

दुसऱ्या टप्प्यासाठी 10 नोव्हेंबरला अधिसूचना जारी होणार

अर्ज छाननी

पहिला टप्पा: 15 नोव्हेंबर

दुसरा टप्पा:18 नोव्हेंबर

अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

पहिला टप्पा: 17 नोव्हेंबर

दुसरा टप्पा: 21 नोव्हेंबर

किती टप्प्यात पार पडणार मतदान: दोन टप्प्यात निवडणूक

पहिला टप्पा: 1 डिसेंबर

दुसरा टप्पा: 5 डिसेंबर

मतमोजणीची तारीख: 8 डिसेंबर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com