Gujarat Elections 2022 : आपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा ; 'हे' असतील उमेदवार

Gujarat Assembly Elections : गुजरातच्या एका वृत्तवाहिनीत वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी काम केले आहे.
isudan gadhvi
isudan gadhvisarkarnama

Gujarat Assembly Elections : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (AAP)मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे. (isudan gadhvi latest news)

इसुदान गढवी हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील, असे टि्वट केजरीवाल यांनी केले आहे. इसुदान गढवी हे खंभालिया विधानसभा मतदार संघातून ते निवडणूक लढविणार आहेत. गुजरातमधील 'आप'चे तळागाळातील नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, व्यापारी यांच्या हक्कासाठी आवाज उठविणारे इसुदान गढवी हे खंभालिया येथून निवडणुक लढतील, असे अरविंद केजरीवाल यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. पत्रकार असलेले इसुदान गढवी यांनी केजरीवाल यांच्या उपस्थितीत 14 जून 2021 रोजी पक्षात प्रवेश केला आहे. इशुदान गढवी हे सध्या आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस आहेत.

isudan gadhvi
Jitendra Awhad resign : आव्हाडांवर विनयभंगाच्या गुन्हा दाखल ; राष्ट्रवादीकडून जाळपोळ

10 जानेवारी 1982 रोजी गुजरातमधील पिपलिया येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेले इसुदान गढवी हे दलित चळवळीतही क्रिय होते. गुजरातच्या एका वृत्तवाहिनीत वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी काम केले आहे.

इसुदान गढवी यांच्याशिवाय मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अन्य नावेही चर्चेत होती. त्यापैकी एक गोपाल इटालियाचे नाव होते. गोपाल इटालिया हे गुजरातमधील आम आदमी पक्षाचा प्रमुख चेहरा आहेत. मात्र, ते अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले.

isudan gadhvi
मोठी बातमी : Jitendra Awhad राजीनामा देणार ; टि्वटमुळे खळबळ

असा आहे गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम

पहिल्या टप्प्यासाठी 5 नोव्हेंबरला अधिसूचना जारी होणार

दुसऱ्या टप्प्यासाठी 10 नोव्हेंबरला अधिसूचना जारी होणार

अर्ज छाननी

पहिला टप्पा: 15 नोव्हेंबर

दुसरा टप्पा:18 नोव्हेंबर

अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

पहिला टप्पा: 17 नोव्हेंबर

दुसरा टप्पा: 21 नोव्हेंबर

किती टप्प्यात पार पडणार मतदान: दोन टप्प्यात निवडणूक

पहिला टप्पा: 1 डिसेंबर

दुसरा टप्पा: 5 डिसेंबर

मतमोजणीची तारीख: 8 डिसेंबर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com