Gujarat Election 2022 : निवडणूक गुजरातची , चर्चा बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' व्हिडिओची.. 'अभी भी टाइम है...'

Gujarat Election 2022 : जामनगरच्या जागेवरुन नणंद-भावजयीचा संघर्ष निर्माण झाला आहे.
Balasaheb Thakrey
Balasaheb ThakreySarkarnama

Gujarat Election 2022 : गुजरातमध्ये विधानसभेच्या (Gujarat Election 2022) पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरवात झाली आहे. गुजरातमध्ये भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. (Gujarat Election 2022 voting live update)

क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी रीवाबा जडेजा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. रीवाबा जडेजा यांना जामनगर उत्तर मतदारसंघातून लढत आहेत. रीवाबा यांच्याविरोधात त्यांची नणंद नैना जाडेजा या निवडणूक रिंगणात आहेत. जामनगरच्या जागेवरुन नणंद-भावजयीचा संघर्ष निर्माण झाला आहे.यात जडेजांच्या वडीलांनी सुनेच्या विरोधात प्रचार केला आहे.

Balasaheb Thakrey
Gujarat Election 2022 : मतदानाला गालबोट ; भाजप उमेदवारावर हल्ला ; काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते भिडले

आजच्या मतदानाच्या दिवशी रवींद्र जडेजांनी शेअर केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांच्या भाषणाचा एक जुना व्हिडिओ रवींद्र जडेजांनी समाज माध्यमांवर शेअर केला आहे. या व्हिडिओला रवींद्र जडेजांनी गुजराती भाषेत कॅप्शन दिली आहे.या व्हिडिओची चर्चा सध्या गुजरातमध्ये सुरु आहे.

वासंदा येथे काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यामध्ये वासंदा येथील भाजपचे उमेदवार पियुष पटेल जखमी झाले. काँग्रेसकडून अनंत पटेल रिंगणात आहेत.वासंदा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याने मतदान केंद्रावर काही काळ तणाव होता.

आज 788 उमेदवारांचं राजकीय भवितव्य कोट्यावधी मतदार मतपेटीमध्ये बंद करणार आहेत. संध्याकाळी 5 या वेळेत हे मतदान पार पडणार आहे. कॉंग्रेस, भाजपा, एमआयएम, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय ट्रायबल पार्टी सोबतच यंदा या निवडणूकीत आप देखील आपलं नशीब आजमवणार आहेत.

अरविंद केजरीवाल स्वतः या निवडणूकीच्या रणधुमाळीत प्रचारासाठी उतरले होते. कॉंग्रेस कडून भारत जोडो यात्रा मध्ये काही दिवसांचा ब्रेक घेऊन राहुल गांधी यांनी देखील गुजरात मध्ये प्रचारसभांना संबोधित केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com