Gujarat Assembly Elections : मिशन गुजरात ; राहुल गांधी, मोदी, केजरीवालांची सोमवारी रॅली

Gujarat Assembly Elections : राहुल गांधी २१ नोव्हेंबरला गुजरातमध्ये दाखल होणार आहेत.
Gujarat Assembly Elections latest news
Gujarat Assembly Elections latest newssarkarnama

Gujarat Assembly Elections : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरवात होत आहे. विधानसभेच्या प्रचारसाठी सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत.

प्रचाराला वेग येणार आहे. काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पक्ष या तिन्ही पक्षासाठी सोमवार महत्वाचा दिवस ठरणार आहे. सोमवारी (दि.२१) निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या तीन प्रमुख पक्षांचे नेते गुजरातमध्ये आपल्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल सोमवारी (दि. २१) निवडणूक रॅलीला संबोधित करणार आहेत. अरविंद केजरीवाल रविवारी (दि.२०) गुजरातमध्ये दाखल होतील.

केजरीवाल २२ नोव्हेंबरपर्यंत प्रचार करणार आहेत. पी.एम. नरेंद्र मोदी १९ ते २१ नोव्हेंबर पर्यंत गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी २१ नोव्हेंबरला गुजरातमध्ये दाखल होणार आहेत.

Gujarat Assembly Elections latest news
Savitribai Phule Pune University : पुणे विद्यापीठाच्या अधिसभेसाठी आज मतदान

शनिवारीपासून नरेंद्र मोदी गुजरातच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते गुजरातमध्ये ८ सभांना संबोधित करणार आहेत. मोदी २३ आणि २४ नोव्हेंबरला पुन्हा एकदा गुजरात दौरा करणार आहेत.

पीएम मोदी रविवारी सकाळी सोमनाथ मंदिराचे दर्शन घेऊन पूजा करतील. यानंतर ते वरावल, धौराजी, अमरेली आणि बोटाडमध्ये प्रचार सभेला संबोधित करणार आहेत. वराहलमध्ये ११ वा, धौराजीमध्ये १२.४५ वा. तर अमरेलीमध्ये दुपारी २.३० वा ते जनतेशी संवाद साधतील.

Gujarat Assembly Elections latest news
तिहार जेलमधील AAP नेत्याचा VIDEO व्हायरल ; ईडीची तक्रार खरी ठरली ?

राहुल गांधी सध्या ‘भारत जोडो यात्रे’चे नेतृत्व करत आहेत. भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ती २० नोव्हेंबरला मध्यप्रदेशमध्ये प्रवेश करणार आहे.

राहुल गांधी २१ नोव्हेंबरला विराट सभेला संबोधित करण्यासाठी दक्षिण गुजरातमधील राजकोट आणि महुआमध्ये पोहचतील. २१ नोव्हेंबरला काँग्रेस नेते राहुल गांधी हे राजकोट आणि सुरतमध्ये सभेला संबोधित करतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com