पालकमंत्रीपद : कुणाला मिळणार कोणता जिल्हा ?

Shinde-Fadanvis Government| राज्य सरकार लवकरच पालकमंत्री पदाचा तिढा सोडवणार आहे
 Shinde-Fadanvis Government|
Shinde-Fadanvis Government|

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार स्थापन होऊन तीन महिने लोटले तरी जिल्ह्यांना पालकमंत्री (Guardian Minister) नाहीत. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वारंवार शाब्दिक चकमकी होत आहेत. असे असताना आता जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांबाबत या आठवड्यात निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार लवकरच पालकमंत्री पदाचा तिढा सोडवणार आहे. पहिल्या टप्प्यात कॅबिनेट मंत्र्यांना दोन-दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे. तर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर राज्यमंत्र्यांकडे एका-एका जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले जाईल.

 Shinde-Fadanvis Government|
तुषार हंबीर हल्ला प्रकरणात तीन पोलीस निलंबित

- औरंगाबादच्या पालक मंत्रीपदावरून अडलं होतं घोडं

जिल्ह्याला कधी नव्हे ते तीन कॅबिनेट मंत्री आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद अशी महत्वाची जबाबदारी मिळाली आहे. शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळ विस्तारात (Aurangabad) औरंगाबाद पुर्वचे आमदार अतुल सावे (Atul Save) यांना गेल्यावेळच्या राज्यमंत्री पदावरून कॅबिनटेमध्ये बढती मिळाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार? याची उत्सूकता लागली आहे.

मंत्रीमंडळ विस्तार रखडल्यानंतर सातत्याने जिल्ह्याला पालकमंत्री नेमा अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. (Abdul Sattar) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला तेव्हा यासंदर्भातील मागणी केली होती. विस्तार लांबत असेल तर किमान पालकमंत्री तरी नेमा, म्हणजे ते कामाला लागतील, अशी सूचना पवारांनी केली होती.

ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्री राहिलेल्या संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार या दोघांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटाने आपले लक्ष्य शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादवर केंद्रीत केले आहे हे दिसतेच. पण भाजपला देखील उद्धव सेनेची ताकद या जिल्ह्यातून नष्ट करायची असल्याने पालकमंत्रीपदावर त्यांच्याकडून दावा केला जाऊ शकतो. त्यामुळेच सावे यांना कॅबिनेट पदी बढती देत भाजपने पालकमंत्री पदावर डोळा ठेवला असल्याचे दिसते.

मराठवाड्याची राजधानी आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचा असा हा जिल्हा असल्याने कधी नव्हे ते केंद्र आणि राज्याच्या सरकारमध्ये औरंगाबादला मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग झाला तेव्हापासूनच भाजपने स्थानिक नेत्यांना बळ देण्यास सुरूवात केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com