Nawab Malik : नवाब मलिकांना मोठा दिलासा; जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Nawab malik News : मलिक गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे कोर्टाने मान्य केले.
Nawab malik News
Nawab malik News Sarkarnama

Mumbai High Court : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी मलिकांना उच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिला. नवाब मलिक यांच्यावर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधीत आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. त्याप्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून ते अटकेत आहेत.

मलिक यांनी ईडीने केलेल्या अटके विरोधात जामिनासाठी अर्ज केला. तेसच मलिक हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे त्यांच्या जामीनावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती मलिकांच्यावतीने वकिलांनी न्यायालयात केली. त्यानंतर नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

Nawab malik News
Meghalaya Election 2023 : मोदींच्या रॅलीला मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात नकार ; भाजपला दणका

मलिक हे गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे कोर्टाने मान्य केले. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मलिकांच्या जामिनावर तातडीच्या सुनावणीसाठी निर्देश दिले. त्यामुळे मलिकांना काहीसा दिलासा मिळाला असून येत्या मंगळवारपासून त्यांच्या जामिनावर सुनावणी पार पडणार आहे.

वैद्यकीय कारणासाठी मलिकांना जामीन मिळणं हा त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे. तसेच पीएमएलए कायदा कलम 45 नुसार ते पात्र आहेत. त्यांना वयानुसार शारीरिक व्याधी आहे. त्यामुळे मलिकांना चांगल्या उपचारांची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद मलिक यांच्यावतीने वकील अॅड.अमित देसाई यांनी केला.

Nawab malik News
Solapur DCC Bank : मोहिते पाटील, सोपल, परिचारक, शिंदे बंधूंसह दिग्गजांना डीसीसीत ‘नो एन्ट्री’? चंद्रकांतदादांच्या काळातील ‘त्या’ कायद्याचा अडसर

त्यानंतर नवाब मलिक हे गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे कोर्टाने मान्य केले. मलिकांच्या जामीनावर पुढील आठवड्यात तातडीची सुनावणी घेण्याचे उच्च न्यायालयाने मान्य केले. पुढील सुनावणी आता मंगळवारी पार पडणार आहे.

Nawab malik News
Chandrashekhar Bawankule : आम्ही संपूर्ण निवडणुकीत कधीही हिंदुत्वाविषयी चर्चा केली नाही; बावनकुळेंचा दावा

दरम्यान, ईडीने नवाब मलिक यांना गेल्या वर्षी 23 फेब्रुवारीला अटक केली होती. तेव्हापासून मलिक हे तुरुंगात आहेत. मलिकांवर गंभीर आरोप असल्याचे कारण देत त्यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला होता. आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी त्यांना न्यायालयाने काहीसा दिलासा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com