ग्रामपंचायतचा बिगुल वाजला; सात हजार 751 गावांमध्ये रणधुमाळी

Gram Panchayat election : पुन्हा गावांमध्ये रंगणार राजकारण
Gram Panchayat election
Gram Panchayat electionsarkarnama

Gram Panchayat election : राज्यातील सात हजार 751 ग्रामपंचायतच्या निवडणुका (Gram Panchayat election) आज (ता. ९) अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक आयोगाने (Election Commission) ग्रामपंचायत निवडणुकीबाबतची नोटीस प्रसिद्ध केली आहे. अर्ज भरण्यास 28 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. दोन डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज छाननी पाच डिसेंबरला होणार आहे.

Gram Panchayat election
जामीन मंजूर होताच राऊत आधी गोंधळले, मग भावूक झाले अन् पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले...

अर्ज मागे घेण्याची तारीख साथ डिसेंबर आहे. तर त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. यामुळे आता पुन्हा एकदा राज्यातील सात हजार 751 गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. गावामध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे.

दरम्यान, 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका मागिल महिन्यात पार पडल्या. त्यामध्ये भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांच्या पॅनलमध्ये लढत झाली होती. यामध्ये कोकण विभागात शिवसेना ठाकरे गटाला अधिक ग्रामपंचायती मिळाल्या होत्या. राज्यातील सत्तांतराच्या घडामोडीनंतर होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Gram Panchayat election
Bharat Jodo : `भारत जोडो` मुळे काॅंग्रेस पक्षात युवकांचे महत्व वाढले, निर्णय प्रक्रियेतही सहभाग..

मागील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने (BJP) सर्वांधिक जागा जिंकल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. आता राज्यातील जवळपास सात हजार 751ग्रामपंचायतींची निवडणूक आहे. ही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. महाविकास आघाडीचा निर्णय बदलत शिंदे-फडणवीस सरकारने सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्यय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in