Election : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर; ३० जानेवारीला मतदान तर २ फेब्रुवारीला मतमोजणी

Legislative Council Election : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला!
Voting For Legislative Council Election
Voting For Legislative Council Election Sarkarnama

Legislative Council Election : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये नाशिक व अमरावती विभाग पदवीधर, तर औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्यसंख्या ही ७८ आहे. त्यामध्ये आता पदवीधरच्या दोन आणि तीन शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजप, शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यामध्ये आता सामना पाहायला मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवरच आता सर्वच पक्षात हालचाली गतिमान झाल्या आहेत.

यासाठी १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहेत. यामध्ये नाशिक आणि अमरावती विभाग पदवीधर, तर औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ अशी ही निवडणूक असणार आहे.

Voting For Legislative Council Election
Anil Deshmukh : कर्ज म्हणून घेतलेल्या पैशाला घोटाळा दाखवून अनिल देशमुखांना अडकवण्यात आलं; प्रफुल्ल पटेलांच्या दावा

सध्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे (Congress) सुधीर तांबे हे आमदार होते. तर अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे रणजीत पाटील हे आमदार होते. तसेच औरंगाबाद शिक्षक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे हे आमदार होते. तर कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये बाळाराम पाटील आणि नागपूर शिक्षक मतदारसंघामध्ये नागो गाणार हे आमदार होते.

दरम्यान, आता निवडणूक जाहीर झाल्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार? हे निवडणूक पार पडल्यानंतरच समोर येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in