मुख्यमंत्र्यांना हिजडा म्हणणे शोभते का? : राणा दांपत्याच्या जामिनाला कडाडून विरोध

रवी राणा (Ravi Rnaa) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता सोमवारी होणार
Ravi Rana-Navneet Rana
Ravi Rana-Navneet RanaSarkarnama

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) या दांपत्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज अपूर्ण राहिली. त्यामुळे त्यांना येत्या सोमवारपर्यंत (ता. 2 मे) तुरुंगातच राहावे लागणार आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने पुन्हा सोमवारी सुनावणी होणार आहे. राणा दांपत्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला.

वकिल घरत यांनी राणा यांच्या जामीनाला विरोध करत त्यांचे कृत्य लोकशाहीला मान्य होण्यासारखे नसल्याचा दावा केला. ते म्हणाले की लोकशाहीमध्ये नागरी हक्कांनाही मर्यादा आहेत. राणा पती-पत्नीने सर्व मर्यादा ओलांडत आव्हान दिले. पोलिसांनी राणा दांपत्यांना वेळोवेळी समजावून सांगितले. मात्र ते ऐकत नव्हते. वारंवार सोशल मिडियावरून आक्षेपर्ह वक्तव्य करत होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांशी बोलण्याचा पद्धतही राणां दापत्यांची चुकीची होती, असा दावा घरत यांनी केला.

Ravi Rana-Navneet Rana
राणांचा जामिनासाठी जोरदार युक्तिवाद : "मी 'मातोश्री'वर गेलोच नाही तरी गुन्हा कसा काय?"

हनुमान चालिसा पठणाच्या नावाखाली राणा दांपत्यााला काहीतरी वेगळेच करायचे होते. सरकार कमकुवत होईल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा पद्धतीने त्यांचे वर्तन होते. त्यासाठी त्यांनी हिंदू धर्माचे कार्ड खेळले. हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेने आता हिंदुत्व सोडलेले आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्याच्या हेतूने राणा दांपत्याने हे सर्व केल्याचा युक्तिवादही घरत यांनी केला.

राजद्रोहाचा गुन्हा का दाखल झाला?

घरत यांनी राजद्रोह्याचे गुन्ह्याचे कलम राणा यांना का लावले, याची कारणमीमांसा केली. ``ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेले ग्रहण आहे. ते संपवण्यासाठी जारो कार्यकर्त्यासह मातोश्रीबाहेर हनुमान चालिकेचं पठण करणार आहोत असे वक्तव्य राणांनी केले. हे सरकारला दिलेले आव्हान होते. अटकेत गेल्यानंतर आठ वर्षांचा मुलगा आहे, असे ते आता सांगत आहेत. मात्र हे सारे कृत्य करताना त्या मुलाची आठवण झाली नाही का, असा सवाल घरत यांनी विचारला.

Ravi Rana-Navneet Rana
राज ठाकरे आमचे पाहुणे ; इम्तियाज जलील यांच्याकडून इफ्तार पार्टीचं निमंत्रण

नवनीत राणा यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. २०१४ मध्ये त्यांनी चुकीची कागदपत्रे दिल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर अजूनही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे, याची माहिती घरत यांनी न्यायालयाला दिली. राणा माध्यमांद्वारे शिवसैनिकांना आव्हान देत होत्या. ते कशासाठी हे करत होत्या? शनीची साडेसाती महाराष्ट्राला लागली आहे. ती संपवण्यासाठी `मातोश्री`वर जाणार म्हणजे काय? हे कुणाला आव्हान होते? या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था बिघडू शकत नाही का, असेही सवाल घरत यांनी विचारले.

मुख्यमंत्र्याना उद्देशून राणा दांपत्याने अनेक आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या. एका लोकप्रतिनिधीच्या तोंडात राज्याच्या मुख्यमंत्री विषयीची ही भाषा शोभा देत नाही. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना हिजडा म्हटले गेले. त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना अजून अनावर झाल्या. दोन्ही आरोपी हे राजकिय पक्षांशी संबधित आहेत. या दोघांना जामीन मिळाल्यास ते तपासात अडथळे आणू शकतात. याचा परिणाम गुन्ह्याच्या तपासावर होईल, असा युक्तिवाद करत वकिल घरत यांनी जामीन अर्जाला विरोध केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com