Opposition Leader Attack On State : सरकार अयोध्या दौऱ्यावर, इकडे शेतकरी वाऱ्यावर; विरोधकांचा हल्लाबोल

Nana Patole and Raju Shetty : शेतकरी भाजपपासून दूर गेल्याचा पटोलेंचा दावा
Raju Shetty, Nana Patole
Raju Shetty, Nana PatoleSarkarnama

Maharashtra Politics : सध्या राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घतला आहे. दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात गारांसह पावसाने हजेरी लावली होती. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्यावर आलेल्या अवकाळी संकटात राज्यकर्ते मात्र अयोध्य दौऱ्यावर होते. सरकार अयोध्य दौऱ्यावर असताना राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Raju Shetty, Nana Patole
Chandrakant Patil on Babri: बाळासाहेबांनी चार सरदार पाठवले होते का? बाबरी पाडायला एकही शिवसैनिक नव्हता; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान

राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी प्रभू रामचंद्रांनी प्रजेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले होते. आता एकनाथांच्या राज्यात मात्र शेतकरी अनाथ झाला आहे, असे म्हणत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच दिवसा कमी दराने वीज देण्याची मागणीही त्यांनी केली.

राजू शेट्टी म्हणाले की, "प्रभू रामचंद्राचे दर्शन घ्यायचे तर खुशाल घ्या, ती तुमची व्यक्तिगत बाब आहे. परंतु राज्याच्या प्रमुखाला व्यक्तिगत बाबीपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतात. त्यांनी कर्तव्यावर लक्ष देणे गरजेचे असते. राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका. ज्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला तुम्ही गेला त्यांनी प्रजेला तळहात्याच्या फोडाप्रमाणे जपले होते. त्यामुळेच आजही जनता म्हणते रामाचे राज्य आले पाहिजे. तुमच्या राज्यात रामाचे राज्य निर्माण करायचे असेल तर शेतकऱ्यांना बत्तीचा हात द्या, एवढीच कळळीची विनंती आहे."

Raju Shetty, Nana Patole
Chavan Vs Pawar : अदानीप्रकरणी जेपीसीची मागणी करत पृथ्वीराजबाबांनी शीतपेयांच्या नियमांची पवारांना करून दिली आठवण

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपला शेतकऱ्यांचे काही देणेघेणे राहिले नसल्याची टीका केली. आता भाजपला धडा शिकविण्याची वेळ आल्याचेही त्यांनी यावेळी आवाहन केले. पटोले म्हणाले, "देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांना खलीस्तानी, दहशतवादी, आंदोलनजीवी म्हणतात. भाजपच्या दृष्टीने शेतकरी हा महात्वाचा घटक राहिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आवाहन करतो की भाजपला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे."

Raju Shetty, Nana Patole
Letter to PM Modi : ओमराजेंचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली 'ही' मागणी

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी संपूर्ण सरकार अयोध्येला गेल्याबद्दल अश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे. शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण भाग संकटात आहे. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना सरकार मात्र अयोध्येला जाऊन बसले होते. देवाच्या दर्शनासाठी संपूर्ण सरकार जाते हा प्रकार पहिल्यांदाच प्रकार घडला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी व त्यांच्या प्रश्नांशी सरकारला काही देणेघेणे नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com