MPSC च्या क्रीडा आरक्षणाबाबत उदय सामंतांनी दिलं स्पष्टीकरण

Uday Samant : एखाद्या खेळाच्या प्रकारामध्ये अशिक्षित आहेत म्हणून हिणवणे हे कितपत योग्य आहे?, असा सवाल सामंत यांनी यावेळी उपस्थित केला.
Uday Samant
Uday Samantsarkarnama

मुंबई : दहीहंडीच्या आदल्या दिवशी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गोविंदांना सरकारी नोकरीत 5 टक्के आरक्षण मिळले अशी घोषणा केली. या निर्णयांचे अनेकांनी स्वागत केले मात्र अनेकांकडून तीव्र विरोध केला जात आहे. यात एमपीएससी (mpsc)परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचाही समावेश आहे. यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

उदय सामंत म्हणाले, "दहीहंडी खेळाच्या प्रकारामुळे कुठल्याही एमपीएसीच्या विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही हे खात्रीने सांगतो. 5 टक्के क्रीडा विभागाचे जे आरक्षण आहे त्यात सुरुवातीच्या क्रिडा प्रकारांवरही अन्याय होणार नाही. पण या 5 टक्क्यांच्या आरक्षणात भविष्यात साहसी खेळ म्हणून दहीहंडीचा समावेश केला जाणार आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. यासाठी एक नियमावली तयार केली जाणार आहे,"

Uday Samant
Nilesh Rane : रत्नागिरीत राडा : माफी मागून राणेंनी केली कशीबशी आपली सुटका

"वयोगट, शिक्षण काय असावे याचे निकष ठरवले जाणार आहेत. तालुका, जिल्हा स्तरावर स्पर्धा असल्या पाहिजेत त्यातून टॅलेंट सर्च केले जाईल. या सर्वाचा परिपाक म्हणजे एखाद्या खेळाचा उपक्रम करत असताना पूर्वीचे जे साहसी खेळ आहेत त्यात कॉमा टाकून हा खेळ अॅड होणार आहे. पूर्वीच्या खेळांची मान्यता रद्द होणार नाही. त्यांना 5 टक्के आरक्षण मिळणार नाही असं होणार नाही,"असे सामंत यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला, काही लोक म्हणतात की, गोविंदांचे थर लावणारे अशिक्षित असतात, त्यामुळे अशिक्षित लोकांना कशाप्रकारे क्रायटेरिया लावून तुम्ही नोकरी देणार? अशा प्रश्न उपस्थित केला गेला. एखाद्या खेळाच्या प्रकारामध्ये अशिक्षित आहेत म्हणून हिणवणे हे कितपत योग्य आहे?, असा सवाल सामंत यांनी यावेळी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com