Mumbai : राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करा : नाना पटोले

राज्यपाल Governer हे मानाचे व प्रतिष्ठेचे पद position of honor and prestige आहे. पण, कोश्यारी Bhagat Singh Koshyari यांनी या पदाची प्रतिमा धुळीस मिळवली आहे.
Bhagat Singh Koshyari, Nana Patole
Bhagat Singh Koshyari, Nana Patolesarkarnama

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबदद्ल अनावश्यक वक्तव्य करून मुंबई व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. कोश्यारी यांची महामहिम राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालपदावरून उचलबांगडी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईच्या आर्थिक राजधानीबद्दल जे वक्तव्य केले ते संतापजनक आहे. बोलण्यापूर्वी त्यांनी व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे. महाराष्ट्राने गुजराती व राजस्थानी समाजाला काय दिले त्याची माहिती कोश्यारी यांनी घ्यावी.

Bhagat Singh Koshyari, Nana Patole
आता आपले राज्यपाल समुद्रातील लाटा मोजत बसले आहेत का; राऊत चिडले...

अदानी, अंबानी व इतर असंख्य उद्योगपती गडगंज झाले. यामध्ये मुंबई व महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा मोठा आहे. देशात मुंबईचे असलेले स्थान कोणीही नाकारू शकत नाही. राज्यपाल हे मानाचे व प्रतिष्ठेचे पद आहे पण कोश्यारी यांनी या पदाची प्रतिमा धुळीस मिळवली आहे.

Bhagat Singh Koshyari, Nana Patole
ज्यांनी इंग्रजांची सत्ता उलथवली; तेच सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना धडा शिकवतील... शरद पवार

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही कोश्यारी यांनी अत्यंत हिनकस विधाने करून आमच्या थोर महापुरुषांचा अपमान केला आहे. राज्यपाल कोश्यारी यांची भूमिका नेहमीच महाराष्ट्रविरोधी राहिली आहे. राज्यपाल पदावर राहून ते सातत्याने बेजाबदार वक्तव्य करत असतात. पण आता त्यांनी मर्यादाही ओलांडली आहे.

Bhagat Singh Koshyari, Nana Patole
राज्यपाल भाजपच्या कारस्थानात सहभागी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आरोप

आम्ही राज्यपालपदाची प्रतिष्ठा जाणतो. पण, ती प्रतिष्ठा त्या पदावरील व्यक्तींनीही जपली आहे. दुर्दैवाने कोश्यारी यांच्याकडून तसे होताना दिसत नाही. महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाची दखल घ्यावी व त्यांना परत बोलावावे अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com