राज्यपाल भाजपच्या कारस्थानात सहभागी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आरोप

Marxist Communist Party| Maharashtra Politics| आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Marxist Communist Party|
Marxist Communist Party|

मुंबई : भाजप नेत्यांच्या भेटीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh koshyari) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला बहुमत सिध्द करण्याचे पत्र पाठण्यात आले. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी गुरूवारी (ता. 30) विशेष अधिवेशन बोलावून बहुमत चाचणीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ठाकरे सरकारचा फैसला उद्याच होणार आहे.

दरम्यान, सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा राज्यपालांचा आदेश बेकायदेशीर असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी केली आहे. तसेच आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी याबाबत प्रसिद्धीपत्राद्वारे माहिती दिली आहे.

Marxist Communist Party|
Gulabraao Patil: संजय राऊत यांना योग्य वेळी चूना लावू; गुलाबराव पाटलांचा टोला

भ्रष्टाचारातून जमा केलेला प्रचंड पैसा आणि केंद्रीय तपास यंत्रणा यांचा गैरवापर करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे भाजपचे कारस्थान आता उघड झाले आहे. त्यामुळे राज्यापालांकडून तातडीने ३० जूनलाच सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देण्यात आले आहे. यातून महाराष्ट्राचे राज्यपाल या कारस्थानात सहभागी झाल्याचेही दिसून येते. विधान परिषदेच्या १२ आमदारांची आणि नियमित सभापतींची नियुक्ती करण्यात दीर्घकाळ आडवे येणाऱ्या राज्यपालांचा हा आदेश संविधानाची हत्या करणारा आहे.

संविधानातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि संघराज्य प्रणालीचे रक्षण करण्यासाठी, महाराष्ट्राचा सन्मान राखण्यासाठी केंद्रातील भाजपच्या फॅसिस्ट व धर्मांध एकाधिकारशाहीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नेहमीच कसून विरोध करत आला आहे आणि यापुढेही करत राहील. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेला सामोरे जाईल तेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉ. विनोद निकोले वरील मूल्यांचे रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे राहून तिच्या सरकारच्या समर्थनार्थ मतदान करतील, असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com