Eknath Shinde: ठरलं तर...! बहुमत चाचणीसाठी एकनाथ शिंदे मुंबईत येणार

Maharashtra Political Crises | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (३० जून) उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
Maharashtra Political Crises News, Eknath Shinde News, Maharashtra Floor Test News
Maharashtra Political Crises News, Eknath Shinde News, Maharashtra Floor Test News

मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून गुवाहाटीत ठाण मांडलेले शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचा गट उद्या (३० जून) मुंबईत येणार आहेत. उद्या बहुमत चाचणीसाठी ते मुंबईत येणार असल्याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. गुवाहाटीत कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांना माहिती दिली.(Maharashtra Political Crises)

राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच शिगेला पोहचला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधाभवन सचिवालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यासाठीचे आदेश देणारं पत्र पाठवले. यानंतर गुरुवारी (३० जून) उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या पत्रानंतर 30 जूनला बहुमत चाचणी करण्यात येणार आहे.(Eknath Shinde News in Marathi)

Maharashtra Political Crises News, Eknath Shinde News, Maharashtra Floor Test News
देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटले; `करेक्ट कार्यक्रम` ठरवून आले..

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला ३० जूना बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी तातडीने अधिवेशन बोलण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही कारणास्तव अधिवेशन तहकुब करता येणार नाही. गुप्त पद्धतीने मतगान होणार नाही, शिरगणती करुन बहुमत चाचणी होईल. उद्या सकाळी ११ वाजता अधिवेश सुरु होईल, बहुमत चाचणी प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण होईल.

देवेंद्र फडणवीस यांनी रात्री साडेनऊच्या सुमारास राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर तातडीने घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राज्यपाल आज ना उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजपने आज उघडपणे आपली भूमिका राज्यपालांकडे मांडली. काही अपक्ष आमदारांनी राज्यपालांकडे सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयात काल झालेल्या सुनावणीत एकनाथ शिंदे यांनीही ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचे नमूद केले होते. त्यानुसार फडणवीस यांनी सरकार अल्पमतात आल्याचे राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com