राज्यपालांची कोरोनावर मात; सत्तास्थापनेच्या हालचालींचा वेग वाढणार?

Bhagatsingh koshyari| गेल्या आठवड्यात सत्ता संघर्षाच्या काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोरोनाची लागण झाली होती.
Bhagatsingh koshyari|
Bhagatsingh koshyari|

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहेत. बंडखोर आमदार गुवाहाटीत ठाण मांडून बसले आहेत. तर राज्यातही तिन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते सरकार टिकवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहेत. या घडामोडींमध्ये आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारीदेखील कोरोनावर मात करुन आजच पुन्हा राजभवनावर परतत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता नव्या सत्तास्थापनेच्या प्रक्रियेच्या हालचालींना वेग मिळू शकतो, अशी चर्चा सुरु झाली आहे.

गेल्या आठवड्यात सत्ता संघर्षाच्या काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोरोनाची लागण झाली होती. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता राज्यपाल कोविडमधून पूर्णपणे बरे होऊन रूग्णालयातून डिस्चार्ज घेऊन आजच राजभवनात परतणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपालांचे वय लक्षात घेता कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांना विलगीकरणात राहावे लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या काळातच राज्यपालांची अनुपस्थिती हा पेच फारच मोठा होता. पण आता राज्यपाल आजपासून राजभवनमध्ये परतणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेचे आज नाशिकमध्ये बंडखोरांविरोधात शक्तिप्रदर्शन!

तर दुसरीकडे राज्यातील सत्ता संघर्षही शिगेला पोहचला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या हालचाली वाढल्या आहेत. आज ते पुन्हा राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी ते चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आज बैठक पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी १२ वाजता बंडखोर आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. गुवाहाटीतील ज्या हॉटेलमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार मुक्कामी असल्याची बातमी आहे. तेथील बुकिंग ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com