Bhagat Singh Koshyari : 'राज्यपालांना भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची साथ!'

Bhagat Singh Koshyari News : राज्यपालांचे फोटो लावलेल्या खोक्यांचं ठाकरे गटाकडून समुद्रात विसर्जन
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh KoshyariSarkarnama

Bhagat Singh Koshyari News : ''राज्यपाल असे वक्तव्य करून महापुरुषांची बदनामी करत आहेत. एवढंच नाही तर त्यांना भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची साथही आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी अशा कितीही वेळा अटक झाल्या तरी आम्ही घाबरणार नाहीत, असं म्हणत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. राज्यपालांचा निषेध करणारी विविध ठिकाणी आंदोलनेही करण्यात आली. आता ठाकरे गटाच्यावतीने राज्यपालांचा फोटो लावलेल्या खोक्यांचं समुद्रात विसर्जन करत अनोखं आंदोलन करण्यात आलंय. यावेळी दानवे बोलत होते.

Bhagat Singh Koshyari
राज्यपाल कोश्यारींच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीचं 'धोतर फेडो' आंदोलन

मुंबईतील (Mumbai) गिरगावच्या समुद्र किनाऱ्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान खोक्यांवर राज्यपालांचे फोटो लावले होते. तर त्यावर राज्यपालांच्या विरोधातील घोषणा लिहिलेल्या होत्या. त्यानंतर राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे खोके समुद्रात टाकण्यात आले.

या आंदोलनादरम्यान अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्त्ये उपस्थित होते. यावेळीच पोलिसांनी ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी अंबादास दानवे यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in