मुख्यमंत्री छा जा रहे है; राज्यपालांची एकनाथ शिंदेंवर स्तुती सुमने

राज्यापाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एकाच व्यासपीठावर आले होते
Eknath Shinde, Bhagat Singh Koshyari
Eknath Shinde, Bhagat Singh Koshyarisarkarnama

मुंबई : आपल्या प्रदेशाचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना काही दिवसच झाले आहेत. ते सर्वत्र प्रसिद्ध झाले आहेत. मुख्यमंत्री छा जा रहे है, साथ मै बादल भी छाये जा रहे है. अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शिंदे यांचे कौतुक केले.

भारत जैन महामंडळांच्या क्षमायाचना कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. यांनी राज्यपालांनी शिंदे यांच्यावर स्तुती सुमने उधळली. राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, आपण सर्व भारतीय आहोत. बौद्ध असो, जैन असो किंवा कोणत्याही जातीचा, असो सर्वत्र एक गोष्ट दिसून येते. ती म्हणजे आपल्याला क्षमा मागणे व क्षमा करणे यायला हवे.

Eknath Shinde, Bhagat Singh Koshyari
शिंदे गटाचा भाजपलाच धक्का; पक्षातील अनेक पदाधिकारी फोडले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, सरकार स्थापन होऊन अगदी दोन-अडीच महिन्यांचा कार्यकाळ उलटला. मात्र, या दोन महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाने जनतेला आपलेसे केले. मुख्यमंत्री शिंदे यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. मुख्यमंत्री छा जा रहैं है, बादल भी छाँ जा रहे हैं, असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

ठाकरे सरकार पडल्यापासून शिवसेना आणि शिंदे यांचे एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोपांचे वार सुरु आहेत. दोन्हीकडूनही मनोमिलनाचा प्रयत्न अजूनपर्यंत तरी झाला दिसत नाही. याच कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टाळी देण्यासाठी हात पुढे केला. मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगले वाद मिटतात, असे म्हणत शिंदे यांनी मनोमिलनाची तयारी दाखवली का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Eknath Shinde, Bhagat Singh Koshyari
मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टाळी मागितली? म्हणाले क्षमा करायला...

शिंदे यांनी मैत्री दिवसाच्या निमित्ताने ठाकरेंना झाले गेले विसरुन जा, असे अप्रत्यक्षपणे सांगत एकत्र येण्याची साद घातली. मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात. मात्र, क्षमा करण्यासाठी मोठे काळीज लागते, असे शिंदेंनी सांगितले. शिंदे यांनी मैत्रीचा चेंडू ठाकरेंच्या कोर्टात ढकलला. यामुळे शिंदे यांच्या मनात काय, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com