भगतसिंह कोश्यारी हे भाजपचेच नेते ; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर नवाब मलिकांनी (Nawab Malik) गंभीर आरोप केले आहेत. राज्यपाल भवन राजकीय अड्डा झाला आहे,'' असेही नवाब मलिक म्हणाले.
 Nawab Malik
Nawab Maliksarkarnama

मुंबई : ''भाजपच्या नेत्यांना भाजप कार्यकर्ते भेटतात ही काही बातमी नाही, कारण राज्यपालभवन हे आता राजकीय अड्डा झालाय, '' असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर नवाब मलिकांनी (Nawab Malik) गंभीर आरोप केले आहेत.

''भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार,'' अशा बातम्या चालवल्या जात असल्याने त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार प्रहार केला आहे. ''राज्यपाल भवन हे राजकीय अड्डा झाला आहे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे भाजपचे नेते आहेत,'' असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

 Nawab Malik
पंजाबच्या मुख्यमंत्री उमेदवाराबाबत केजरीवाल करणार आज घोषणा

''भाजपचे नेते व कार्यकर्ते राज्यपालांना नेहमीच भेटत असतात. राज्यपाल पदाचा वापर राजकीय हेतूने होत आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यपाल भवन राजकीय अड्डा झाला आहे यात कुणाचं दुमत नाही,'' असेही नवाब मलिक म्हणाले.

अँटिलिया प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA करीत आहे. या प्रकरणात एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं आहे. यातून अनेक नवीन मुद्दे समोर येत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसापूर्वी भाजपवर आरोप केले आहेत.

नवाब मलिक Nawab Malik म्हणाले की, एनआयएच्या आरोपपत्रात सचिन वाझेला मुख्य आरोपी बनविण्यात आले होते. आम्ही सुरवातीच्या दिवसापासून सांगत आहोत की माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्वतःला वाचविण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. परमबीरसिंग यांनी भाजपसोबत 'डील' केल्याचा थेट आरोप नवाब मलिक यांनी काही दिवसापूर्वी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com