राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मागितली महाराष्ट्राची क्षमा

Bhagat Singh Koshyari | Mumbai | Controversial Statement : तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे.
Bhagat Singh Koshyari Latest Marathi News, Maharashtra Political News
Bhagat Singh Koshyari Latest Marathi News, Maharashtra Political NewsSarkarnama

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबतच्या आपल्या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागितली आहे. २९ जुलै रोजीच्या एका कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चूक झाली, असे म्हणतं कोश्यारी यांनी आपली चूक मान्य केली. तसेच याबाबत माफ करावे असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चूक झाली. पण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.

गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी?

'कधी कधी मी इथं लोकांना म्हणतो की, महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढा, तर तुमच्याकडे पैसाच राहणार नाही. तुम्ही जे मुंबईला आर्थिक राजधानी म्हणताय ती राजधानी राहणारच नाही', असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर मोठा वाद झाला होता. भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in