अनिल परबांचे रिसॉर्ट सरकार पाडणार

शिवसेनेचे आमदार अनिल परब ( Anil Parab ) यांच्या रिसॉर्टवर केंद्रसरकारकडून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
Anil Parab, Kirit Somaiya Latest News
Anil Parab, Kirit Somaiya Latest News sarkarnama

Anil Parab : मुंबईतील दहीहंडी कार्यक्रमात शिवसेनेचा भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडणार असे सांगणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीमुळे शिवसेनेचे माजी आमदार अनिल परब यांच्यावर मोठी कारवाई होणार आहे. अनिल परब ( Anil Parab ) यांच्या रिसॉर्टवर केंद्रसरकारकडून कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

किरीट सोमय्या म्हणाले की, अनिल परब यांचा रिसॉर्ट पडण्याचा केंद्रसरकारच्या पर्यटन विभागाने आदेश काढला आहे. रिसॉर्ट पाडण्याचे महाराष्ट्र पर्यटन विभागाला आदेश आले आहेत. त्यानुसार कारवाई होणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना अनिल परब यांनी मंत्री पदाचा दुरुपयोग केला, असा आरोप त्यांनी केला.

Anil Parab, Kirit Somaiya Latest News
Video : किरीट सोमय्यांचा अनिल परब यांच्यावर निशाणा

ते पुढे म्हणाले की, अनिल परबांनी सेझ कायद्याचे उल्लंघन केले, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी मी करणार आहे. रिसॉर्ट उभारणीसाठी पैसा कुठून आला याचीही चौकशी होणार आहे. 4 ते साडेचार कोटी अनिल परब यांना भरावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Anil Parab, Kirit Somaiya Latest News
'ईडी'ची नोटीस मिळताच अनिल परब साई दरबारात हजर

उद्या रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आदेश देण्याचे सांगितले आहे. अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर कारवाई होणार आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना रिसॉर्ट तोडण्यास उद्या सांगण्यात येईल. अस्लम शेख 28 रिसॉर्ट बांधण्यात आले ते बेकायदेशीर होते.

साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिला आहे. लवकरच हे बंगले पाडले जातील. अनिल परब यांच्याकडे आलेला पैसा हा सचिन वझे यांच्याकडून आला का याची ही चौकशी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com