पुढच्या वर्षी सरकार बरखास्त होईल... महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य येणार....

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून त्या म्हणाल्या, ''शिखर बॅंकेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. त्यात राष्ट्रवादीच्या थोरल्या, तसेच धाकट्या पवारांचाही हात आहे. या घोटाळ्यांची पुन्हा चौकशी झाल्यास राष्ट्रवादीच्या मंडळींना घरामध्ये तोंड लपवून बसण्याची वेळ येईल.''
पुढच्या वर्षी सरकार बरखास्त होईल... महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य येणार....
The government will be dismissed next year ... Ram Rajya will come again in Maharashtra ....

कोरेगाव : काही मंत्री जरंडेश्वर सोसायटी मोडून काढायला निघालेत, असे नमूद करत समाजाविषयी देणे-घेणे नसणारे हे सरकार पुढच्या वर्षी बरखास्त होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य येईल, असा विश्वास जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, जरंडेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी ईडीने योग्य तो निर्णय घ्यावा, यासह नऊ ठराव यावेळी सभेत करण्यात आले. The government will be dismissed next year ... Ram Rajya will come again in Maharashtra ....

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा श्रीमती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील बोलत होत्या.  
त्या म्हणाल्या, जरंडेश्वर साखर कारखाना सभासद शेतकऱ्यांकडून काढून घेण्याचे पाप करणारे राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत. न्यायालयाच्या आदेशानुसार सभासद शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठीच ईडीने जरंडेश्वर साखर कारखाना ताब्यात घेतल्याचे स्पष्ट  केले.

हेही वाचा : ठाकरे सरकार CBI च्या अधिकाऱ्यांना धमकावतयं..
 

श्रीमती पाटील म्हणाल्या, ''न्यायालयाच्या आदेशाने ईडीने नुकताच ताब्यात घेतलेला जरंडेश्वर कारखाना ईडीकडून आपल्याला मिळेल. सहकारमंत्री अमित शहा आपल्याला नक्कीच सहकार्य करतील. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही जरंडेश्वरबाबत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.'' वसंतरावदादांच्या पेन्शनमधून मी माझा औषधांचा खर्च करत आहे. तुम्ही दिलेली आमदारकी, तसेच सांगलीकरांनी दिलेल्या खासदारकीच्या पेन्शनवर जरंडेश्वरची लढाई लढत आहे, असे म्हणत त्या वसंतरावदादा यांच्या आठवणींनी गहिवरल्या. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून त्या म्हणाल्या, ''शिखर बॅंकेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. या घोटाळ्यांची पुन्हा चौकशी झाल्यास राष्ट्रवादीच्या मंडळींना घरामध्ये तोंड लपवून बसण्याची वेळ येईल.'' सभेत चहाऐवजी सभासदांना पेढे वाटा, अशी सूचना श्रीमती पाटील यांनी करताच कार्यकर्त्यांनी पेढे वाटले. 

काही मंत्री जरंडेश्वर सोसायटी मोडून काढायला निघालेत, असे नमूद करत समाजाविषयी देणे-घेणे नसणारे हे सरकार पुढच्या वर्षी बरखास्त होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य येईल, असेही श्रीमती पाटील यांनी सांगितले. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक किसनराव घाडगे यांनी वाचून दाखवलेल्या नऊ ठरावांना सभेने मंजुरी दिली. या वेळी उपाध्यक्ष शंकरराव पाटील, श्रीरंग सापते, पोपटराव जगदाळे, शहाजी भोईटे, दत्तूभाऊ धुमाळ, अक्षय बर्गे, संतोष कदम, शंकर मदने, राहुल चव्हाण आदींसह संचालक, सभासद, शेतकरी उपस्थित होते. 

Related Stories

No stories found.