हिंदुत्वाची चळवळ सरकार दडपतयं; राज यांना पाठिंब्यासाठी प्रवीण दरेकर धावले

Raj Thackeray| Pravin Darekar| मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे.
raj Thackeray|Pravin Darekar
raj Thackeray|Pravin Darekar

मुंबई: औरंगाबादेतील सिटी चौक पोलिसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. भाजप नेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरेंच्या समर्थनार्थ ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले.

राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने ठाकरे सरकारचा जळफळाट होत आहे. तोच राग बाहेर काढण्यासाठी त्यांच्यावर आणि मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. आमच्या विरोधात बोललात तर कायद्याचा वापर करुन तुम्हाला पूर्णपणे दाबून टाकू, असा संदेश देऊ पाहत आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन करतील म्हणून मनसेच्या नेत्यांवर कारवाई केली जात आहे. एखादे आंदोलन चिरडायचे ठरवले तर सरकारने काय करु शकते, याचे उदाहरण म्हणून मी मनसेकडे पाहत आहे. मनसेचे मशिदींवरील भोंग्यांबाबतचे आंदोलन चिरडण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याचे सर्व प्रयत्न केले जात असल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.

raj Thackeray|Pravin Darekar
राज्यपाल म्हणाले, ‘भोंगा लगाओ या न लगाओ, मैं क्या बोलू?’

राज्य सरकारला राज्यात शांतता नको आहे. म्हणून राज्य सरकारकडून मनसे नेत्यांची धरपकड,नोटीस किंवा अटकेची कारवाई केली जात आहे. पण अशी हिटलरशाही करुन राज्यात शांतता राखता येईल, असा सरकारचा समज आहे का? असा सवालही प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. पण राज्य सरकार हिंदुत्वाची चळवळ जितकी दडपण्याचा प्रयत्न करेल, तितकी ती उसळी मारून वर येईल, असेही दरेकर यांनी म्हटले.

मनसेच्या आंदोलनाआड राज्यात घातपात करण्यासाठी परराज्यातून लोक आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. पण ते निराधार आणि बेजबाबदारपणे वक्तव्ये करत आहेत. वाटेल ते बोलायचे आणि विरोधकांवर टीका करायची हा दिनक्रम सुरु आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी बाहेरून राज्यात लोक आले असतील तर पोलिसांनी जरुर कारवाई करावी. पण मनसे नेत्यांना नोटीस पाठवून आणि गुन्हे दाखल करुन राज्य सरकार एकप्रकारे अघोषित आणीबाणी लादत असल्याचा दावाही दरेकर यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in