या सरकारला आता गाडलं पाहिजे; वीजबिलावरून मनसे आक्रमक

थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या महावितरणच्या निर्णयावर राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य शासनावर जोरदार टीका केली.
This government should be buried now say MNS leader Bala Nandgaonkar
This government should be buried now say MNS leader Bala Nandgaonkar

मुंबई : थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या महावितरणच्या निर्णयावर राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य शासनावर जोरदार टीका केली. एकीकडे लोकांना गोड बातमी देऊ, असे म्हणणारे सरकार आता थेट वीजपुरवठा खंडित करणार आहे. हे सरकार लोकांचे दुश्मन असून लोकांनीच सरकारला गाडलं पाहिजे, असा आक्रमक पवित्रा नांदगावकर यांनी घेतला. 

वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयांना मंगळवारी दिले आहेत. डिसेंबर 2020 अखेर राज्यात एकूण  63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

महावितरणच्या या निर्णयावर आता टीका होऊ लागली आहे. लॉकडाऊन काळात वाढीव वीजबिलांबाबत मनसेने आक्रमक भुमिका घेत आंदोलने केली. राज्यपालांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर हा मुद्दा काही काळाने थंडावला. पण पुन्हा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने नांदगावकर यांनी सरकारवर टीका केली आहे. 

ते म्हणाले, सरकारचा निर्णय तुघलकी आहे. लोकांच्या भल्यासाठी हे सरकार असल्याचं दाखविले जात आहे. पण हे सरकार लोकांनाच अंधारात ढकलत आहे. मनसेने वीजबिलप्रश्नी अनेक कार्यालये फोडली, रस्त्यावर उतरलो, अनेकांना भेटलो. आणखी काय करायला हवे होते? आता लोकांनीच या सरकारला अंधारात ढकलायला हवे, सरकारला गाडलं पाहिजे, अशी टीका नांदगावकर यांनी केली.

कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही नाहीत पैसे...

राज्यात मार्च 2020 मध्ये कोविड 19 मूळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता. राज्याचे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. 

लॉकडाऊनच्या काळात खाजगी  वीज वितरण कंपन्यांनी थकबाकी वसूल करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची रीतसर परवानगी घेऊन सप्टेंबर 2020 मध्ये थकबाकी वसुलीची मोहीम मुंबई व मुंबई उपनगरात चालू केली व थकबाकीपोटी अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला. मात्र राज्याचे उर्जामंत्री डॉ राऊत यांनी डिसेंबर अखेरपर्यंत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणला निर्देश दिले होते. परंतु आता थकबाकीचा डोंगर  वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्य होत नसल्याने, बँकांची व इतर देणी व कर्मचाऱ्यांचा पगार देणेही अशक्य झाले आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com