Shivsena : पक्ष मिळाला, आता शिवसेना प्रमुख पदाचं काय? शिंदे गटाची होणार कार्यकारिणी

Shinde group : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाच्या हलचाली
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Shinde Group on action mode : निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिलेल्या निकालात शिंदे गटाला शिवसेना (Shivsena) पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण (Bow-Arrow) हे चिन्ह दिले आहे. त्यानंतर शिंदे गटातील हलाचाली वाढल्या आहेत. या निकालानंतर शिंदे गटाची पुढील आठवड्यात कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत कोणते ठराव मांडण्यात येतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde : अमित शाह जास्त बोलत नाहीत, पण फटक्यात काम करुन टाकतात; मुख्यमंत्री शिंदेंनी केले कौतुक

केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) शिंदे गटला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण दिले आहे. हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आयोगाच्या निकालानंतर आता शिंदे आणि ठाकरे गटाने कार्यकारिणीची बैठक बोलावणे गरजेचे असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगितले जात आहे.

काल झालेल्या निकालानंतर शिंदे गटात मोठ्या हलचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार आता शिंदे गटाची कार्यकारिणीची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यात विविध ठराव मांडले जातील, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde
MAHA CONCLAVE : नवी सहकार नीती बनविण्यासाठी सुरेश प्रभूंच्या नेतृत्वाखाली समिती : अमित शहांची घोषणा

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन कार्यकारिणीची बैठक घेईल. त्यात विविध ठराव मांडले जातील. त्यावेळी जे काही निर्णय होतील ते पुन्हा निवडणूक आयोगाला कळविले जातील. ही बैठक पुढील आठवड्याच्या सुरुवातीलाच बोलावली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान ही कार्यकारिणी बैठक कोठे हाईल, त्या ठिकाणाबाबत अद्याप एकमत झाले नाही.

Eknath Shinde
Karad : राज्यकर्ते विलासकाकांसारखे का वागत नाहीत : मकरंद अनासपुरेंची खंत

आता शिवसेना हा पक्ष शिंदे गटाला देण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख या पदाबाबत बैठकीत काय निर्णय होणार? ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याअनुषंगाने ही कार्यकारिणी बैठक राज्यातील राजकीय वर्तुळासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in