ST strike: आमच्या नावानं पावत्या कोण फाडतयं!

आझाद मैदानात सुरु असलेल्या एस.टी.कामगारांची आज सकाळी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी बैठक घेतली.

ST strike: आमच्या नावानं पावत्या कोण फाडतयं!
Gopichand Padalkar, Sadabhau Khotsarkarnama

मुंबई : गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा (ST strike) संप सुरु आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि एसटी संघटना यांच्यात बैठका होत आहेत.पण अद्याप तोडगा निघालेला नाही. आजही महत्वपूर्ण बैठक आहे.

आझाद मैदानात सुरु असलेल्या एस.टी.कामगारांची आज सकाळी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी बैठक घेतली. त्यांनी मंगळवारी राज्य सरकारकडे गेलेल्या एसटी कामगार शिष्टमंडळाशी चर्चा केली. नंतर आज सरकारसोबत चर्चेला जायचे का असे त्यांनी आंदोलनकर्त्यांना विचारले.

सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांना संबोधित करतांना काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पावत्या देत पैसे वसूल केले, आमच्या नावाची बदनामी केली, असा आरोप केला. गोपीचंद पडळकर यांनी ''आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला पैशांची गरज नाही,'' असे आंदोलकांना सांगितलं.

सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर म्हणाले, ''आंदोलन सुरू ठेवणारे कोणी असतील त्यांच्या सोबत जा, आम्ही सरकारसमोर चर्चेला जाणार नाही, नेतृत्व करणार नाहीत, सरकार सोबत तुम्हीच चर्चा करा.'' यानंतर पडळकर, खोत हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी निघून गेले.

Gopichand Padalkar, Sadabhau Khot
आझाद मैदानात ड्रामा ; पडळकर, खोत आंदोलनातून बाहेर पडणार होते..

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांनी या बैठकीत तोडगा सांगितला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकार, महामंडळाने हा तोडगा स्वीकारल्यास एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात पाच ते 10 हजार रुपयांची वाढ होणार असल्याचे समजते.

गुजरातमधील एसटी कर्मचाऱ्यांना सर्वात कमी पगार आहे. तर, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या कर्मचाऱ्यांचा पगार जवळपास सारखाच आहे. मध्यप्रदेशमधील कर्मचाऱ्यांचा पगार महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक आहे. सध्या सुरु असलेल्या संपातील विलिनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टाच्या समिती समोर आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in