एसटी आंदोलनाचा किल्ला लढविणारे खोत आणि पडळकर हे दोघेही अडकले कोंडीत!

पडळकर आणि खोत हे सरकारने जाहीर केलेल्या पगारवाढीनंतर आंदोलन थांबविण्याच्या मनःस्थितीत
एसटी आंदोलनाचा किल्ला लढविणारे खोत आणि पडळकर हे दोघेही अडकले कोंडीत!
Gopichand Padalkar, Sadabhau Khotsarkarnama

मुंबई : गेली 15 दिवस एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) सुरु आहे. या संपासंदर्भात तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची घोषणा केली. सरकारने वेतनावाढ देऊनही कर्मचारी संपवार ठाम आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने सरकारशी बोलणी करणारे नेते भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणी सदाभाऊ खोत यांचीच कोंडी झाली आहे.

अनिल परब यांनी घेलेल्या पत्रकार परिषदेला कर्मचाऱ्याचे प्रतिनिधी म्हणून पडळकर आणि खोत उपस्थित होते. परब यांच्या घोषनेनंतर आम्ही मुंईतील आझाद मैदानावर बसलेल्या कर्चमचाऱ्यांशी संवाद साधू असे पडळकर यांनी सांगितले होते. मात्र, ते आझाद मैदानावर गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी विलीनीकरण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे पडळकर यांचीच अडचण झाली.

Gopichand Padalkar, Sadabhau Khot
पडळकर आणि खोत यांना सरकारने फसवलय : सदावर्ते यांच्या आरोपाने पुन्हा तिढा

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची सुरुवातच पडळकर यांच्या नेतृत्वात झाली. पहिल्या दिवसापासून ते कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खादा लावून आंदोलन करत आहेत. त्यांनी सुरुवातीपासून विलीनीकरणाची मागणी लावून धरली होती. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विलीनीकरणारवर मध्यम मार्ग काढावा असे वक्तव्य केले होते. त्यानंतर पडळकर यांनीही सूर बदलला आणि इतर मुद्यावर सरकारची चर्चा केली. त्यामध्ये न्यायालयाने स्थापन केलेल्या समिती निर्णय मान्य करणे आणि पगारवाढ यावर अनिल परब आणि पडळकर यांच्यामध्ये चर्चा होऊन त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतील. सरकारने समिती घेईल तो निर्णय मान्य असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि इतर भत्ते राज्य सरकारच्या कर्चमचाऱ्यांप्रमाणे लागू करण्याचेही जाहीर केले. त्यानंतरही कर्मचारी आंदोलनावर ठाम असल्याने पडळकर आणि खोतच अडतणीत आले.

Gopichand Padalkar, Sadabhau Khot
एसटी कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ जाहीर : 3600 ते 7200 रुपयांनी वेतन वाढणार

दरम्यान, पडळकर आणि खोत यांच्यावर राजकारण करत असल्याचाही आरोप झाला. ब्रम्हपुरी आगारातील एका आंदोलकांने संघटनेचे नेते अजय गुजर यांच्याशी फोनवरुन आंदोलनाबाबत संवाद साधला. यावेळी गुजर यांनी राजकीय नेत्यांवर हल्लाबोल केला होता. पडळकर आणि खोत यांच्यासोबत आंदोलकांची बैठक सुरु आहे, याबाबत विचारले असता अजय गुजर म्हणाले, ''या बैठकीचा आपला काहीही संबध नाही, आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी त्यांनी बैठक घेतली आहे. आपला लढा हा सुरु आहे. संप मिटला असे कुणीही सांगितले यावर विश्वास ठेवू नका, जोपर्यंत मी आणि सदावर्ते सांगत नाही. तोपर्यंत हा लढा सुरुच राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आता आंदोलन सोडावे की कर्मचाऱ्यांची मागणी लावून धरावी, असा प्रश्नच पडळकरांसमोर उभा राहिला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in