Good news: आता महिला पोलिस कर्मचाऱ्यांची ड्युटी फक्त ८ तासांची

पोलिस दलात (Police force) कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांवर कामाची आणि कौटुंबिक जबाबदारी असते. त्यात त्यांची बरीच दमछाक होते.
womens police
womens police

मुंबई: कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारी यांतील ताण कमी करण्यासाठी महिला पोलिस (Women police) कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास कमी करणे हा एक उपाय ठरू शकतो, असे पोलिस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pande) यांनी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. मुंबई पोलिस दलातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास १२ वरुन ८ तास करण्याच्या सुचना पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी दिल्या आहेत.

संजय पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर ८ तास ड्युटीचा उपक्रम सुरू करण्याचे पांडे यांचे आदेश देण्यात आले आहे. पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांवर कामाची आणि कौटुंबिक जबाबदारी असते. त्यात त्यांची बरीच दमछाक होते. त्यामुळे महिला कर्मचारी आजारी पडणे आणि इतर व्याधींनी ग्रासतात. त्यामुळे त्याची ८ तास ड्युटी केल्यास महिला पोलिस कर्मचारी गैरहजर राहणे, आजारी पडणे हे प्रमाण कमी होईल. मात्र सण उत्सव काळात महिला कर्मचार्यांच्या तासांबाबत वरिष्ठा़ंना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.

womens police
पुण्यात १ फेब्रुवारीपासून शाळा-महाविद्यालयांचे पुनश्चः हरी ओम!

दरम्यान, गेल्या वर्षीही संजय पांडे यांनी महाराष्ट्रातील पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आता ८ तासाची ड्युटी देण्याचा निर्णय घेतला होता. नागपूर, पुणे, अमरावती या सह राज्यातील अनेक शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा निर्णय राबवण्यास सुरुवातही झाली होती. कर्तव्य व जबाबदारीचा ताळमेळ साधण्यासाठी महिला पोलिस कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लाहते. त्यामुळे पोलिस आयुक्तालयांतर्गत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना आठ तास ड्युटी दिली जावी, अशी विनंती महिला कर्मचाऱ्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com