तीन कोटींची सोनेचोरी : केरळ पोलिसांची साताऱ्यात कारवाई

शोध घेताना नाशिक येथील संशयित जोशी हा साताऱ्यात महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील एका हॉटेलमध्ये आपल्या दोन साथीदारांसह तसेच कोरेगाव तालुक्यातील एका मित्रासमवेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तीन कोटींची सोनेचोरी : केरळ पोलिसांची साताऱ्यात कारवाई
Gold theft of Rs 3 crore: Kerala police take action in Satara

सातारा : केरळ राज्यातील एका बँकेचे तीन कोटी रुपये किमतीचे साडेसात किलो सोने चोरल्याच्या गुन्ह्यात काल (शुक्रवारी) रात्री केरळ आणि सातारा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चार जणांना साताऱ्यातून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांना केरळ येथे नेण्यात आले आहे. Gold theft of Rs 3 crore: Kerala police take action in Satara

केरळ पोलिसांत एका बँकेचे तीन कोटी रुपये किमतीचे सोने चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास केरळ पोलिस करत होते. तांत्रिक तपासात नाशिक येथील निक जोशी या युवकाचा या गुन्ह्यात समावेश असून तोच मुख्यसूत्रधार असल्याचे समोर आले. त्यानुसार केरळ पोलिसांनी नाशिकवर लक्ष केंद्रीत केले, मात्र  संशयित जोशी हा वारंवार जागा बदलत होता. 

गेले काही दिवस नाशिकचा जोशी सातारा परिसरात आल्याची माहिती केरळ पोलिसांना मिळाली होती. यानुसार केरळ पोलिसांचे एक पथक काल (शुक्रवारी) सकाळी सातारा येथे दाखल झाले. त्यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन गुन्ह्याची माहिती तसेच संशयित जोशी सातारा परिसरात असल्याचे सांगितले. यानुसार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशोर धुमाळ यांना केरळ पोलिसांना मदत करण्याचा सूचना केल्या. 

यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे मुनीर मुल्ला, मंगेश मोहिते, शिवाजी भिसे, वैभव सावंत यांना केरळ पोलिसांच्या मदतीला देण्यात आले. शोध घेताना नाशिक येथील संशयित जोशी हा साताऱ्यात महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील एका हॉटेलमध्ये आपल्या दोन साथीदारांसह तसेच कोरेगाव तालुक्यातील एका मित्रासमवेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकत नाशिक येथील मुख्य संशयित जोशी व त्याच्या सातारा व कोरेगाव येथील तीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

ताब्यात घेतल्यानंतर सातारा येथे प्राथमिक चौकशी करून त्या चौघांना केरळ पोलिसांनी केरळ येथे नेले. ताब्यात घेतलेल्या नाशिक येथील जोशी गुन्ह्यातील मुख्यसूत्रधार असला तरी सातारा येथील युवकांचा त्यात सहभाग आहे का, हे तपासानंतर समोर येणार आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याची एक महागडी चारचाकी देखील जप्त केली आहे.

Related Stories

No stories found.