Goa Congress Crisis : कॉंग्रेसमधील बंडखोरी रोखण्यासाठी बडा नेता गोव्यात

Goa politics |गोव्यातील कॉग्रेसमधील परिस्थिती हाताळण्यासाठी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना गोव्यामध्ये पाठविले आहे.
Mukul Wasnik
Mukul Wasnik sarkarnama

पणजी : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांनंतर आता गोव्यातही राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, गोव्यात सत्तेपासून दहा वर्ष दूर असलेल्या कॉग्रेसमध्ये (congress) बंडखोरी (goa rebel) होण्याची शक्यता आहे. चार महिन्यापूर्वी कॉग्रेसशी एकनिष्ठ असल्याचे आश्वासन देणारे आमदार आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. (Goa politics news update)

त्यानंतर आपल्या पाच आमदारांशी पक्षश्रेष्ठींचा संपर्क होत नसल्याचे कॉग्रेसचे संकट वाढले होते. त्यानंतर आता कॉग्रेस अँक्शन मोडमध्ये आली आहे. काँग्रेसचे प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गोव्यातील कॉग्रेसमधील परिस्थिती हाताळण्यासाठी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना गोव्यामध्ये पाठविले आहे.

कॉग्रेसने कारवाईचा बडगा उभारण्यास सुरवात केली आहे. पक्षनेतेपदावरुन मायकल लोबो यांना हटविलं आहे. मायकल लोबो आणि दिंगबर कामत यांनी भाजपसोबत संगनमत केल्याचा आरोप कॉग्रेसने केला आहे. पैशाचे आमिष दाखवून भाजप कॉग्रेसमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप कॉग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.

Mukul Wasnik
राऊतांनी मानले फडणवीसांचे आभार ; म्हणाले, राज्याला लाभले नवे 'हरुन-अल-रशीद'

कॉग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी पत्रकारांना सांगितले की, भाजप आमच्या आठ आमदारांना पैशाचे आमिष दाखवून भाजपमध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्नात आहे. आमचे सहा आमदार मात्र निष्ठावान आहेत, मला त्यांच्यावर गर्व आहे.

मायकल लोबो आणि दिगंबर कामत या दोघांनी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले असल्याचा आरोप गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केला आहे. या दोन्ही नेत्यांविरोधात आता कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मायकल लोबो यांना काँग्रेस गटनेतेपदावरून हटवण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. दिनेश गुंडू राव यांच्या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे पाच आमदार उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com